मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भायखळ्यातील घोडपदेव, दोन टाकी, नागपाडा येथे अंमली पदार्थ विरोधी सेलने विशेष मोहिमे दरम्यान उच्च प्रतीच्या ‘काश्मीरी चरस’ची तस्करी करणाऱ्या आंतर-राज्यीय काश्मीरी टोळीला गजाआड केले आहे.
या टोळीच्या प्रमुखासह मेफेड्रोनची तस्करी करणारी टोळी अशा ६ तस्कऱ्यांविरुद्ध कारवाई करत एकुण १.५० कोटीपेक्षा अधिक किमतीचे अंमली पदार्थ जप्त केले आहेत.
सदर तपासा दरम्यान जप्त केलेला एकुण मुद्देमाल व अंदाजे २.६ कि.ग्रॅ. उच्च प्रतीचा काश्मीरी चरस १ कोटी ४ लाख रुपये, १२० ग्रॅ. वजनाचा मॅफेड्रोन (एम.डी.) २४ लाख व रोख रक्कम २२ लाख रुपये जप्त केले आहे.