इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
एसटी महामंडळाच्या स्टेट ट्रान्सपोर्ट को ऑपरेटिव्ह बँकेच्या १९ पैकी १२ संचालकांनी तडकाफडकी राजीनामा दिला असल्याचे वृत्त होते. पण, त्यानंतर त्यांनी हा राजीनाम दिला नसून त्यांनी वेगळा गट स्थापन केल्याची माहिती पुढे आली आहे. त्यांच्या राजीनामा देण्याचा विचार बदलला व त्यानंतर त्यांनी वेगळा गट स्थापन केला. प्रसिध्द वकील गुणरत्न सदावर्ते यांना मोठा धक्का दिला आहे.
या संचालकांनी वेगळा गट एसटी महामंडळात बँकेत स्थापन केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. हे सर्वच्या सर्व १२ संचालक ट्रॅव्हलरमधून एसटी महामंडळाच्या बँकेत पोहोचले. त्यानंतर त्यांनी अतिरिक्त संचालक बिमनवार यांची भेट घेत हे पत्र सुपूर्द केले. १९ पैकी १२ संचालकांनी वेगळा गट स्थापन केला.
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावेळी गुणरत्न सदावर्ते यांनी आधी कर्मचाऱ्यांचे वकीलपत्र घेऊन आंदोलन केल्यानंतर त्यांची राज्यभर चर्चा झाली. त्यानंतर ते एसटी कर्मचा-यांचे नेत्वृत्व करायला लागले. दरम्यानच्या काळात बँकेच्या निवडणुका लागल्यानंतर त्यांनी आपले पॅनल उभे केले. यावेळी त्यांच्या पॅनलने सत्ताधारी पॅनलचा पराभव करुन सत्ता मिळवली. पण, त्यानंतर या सत्तेचा वापर त्यांना योग्य करता आला नाही. सुरुवातीपासून त्यांच्यावर आरोप होऊ लागले. त्यानंतर ४५० कोटींचा घोटाळा आरोप झाला व येथूनच सर्व बघिडलं.
यापूर्वीच १४ संचालक नॉट रिचेबल झाले होते. त्यानंतर आज या संचालकांनी वेगळा गट स्थापन करत मोठा धक्का दिला. हा निर्णय घेण्याअगोदर हे संचालक उद्योगमंत्री उदय सामंत यांना भेटल्याचे बोलेल जाते. तर गुणरत्न सदावर्ते यांनीही सपत्नीक उदय सामंत यांची भेट घेतली होती. पण, त्यानंतर या घडामोडी घडल्या.