इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
ख्रिसमसच्या आधीच्या दोन दिवसांत केरळमध्ये ८४.०४ कोटी रुपयांची दारू विकली गेली. अजून ३१ डिसेंबरपर्यंत हा आकडा वाढणार आहे. त्यामुळे सर्वाधिक दारु विकणा-या हे राज्यात केरळचा नंबरही असणार आहे. भारतात कोणताही सण येण्याआधीच त्याची तयारी सुरू होते. सणासुदीच्या काळात लोक भरपूर खरेदी करतात आणि त्याचा परिणाम बाजारातही दिसून येतो. नाताळच्या काळातही असेच झाले. वस्तू खरेदी करण्याऐवजी खाण्या-पिण्यावर जास्त खर्च करण्याची मानसिकता तयार झाली आहे. हा ख्रिसमस केरळच्या दारू व्यापाऱ्यांसाठी चांगलाच गेला.
२०२२ मध्ये याच काळात ७५.४१ कोटी रुपयांची दारू विकली गेली होती. त्या वेळी ख्रिसमसचा समावेश केला तर तीन दिवसांत जवळपास १५४ कोटी रुपयांची विक्री झाली आहे. केरळ स्टेट बेव्हरेजेस कॉर्पोरेशन म्हणजेच ‘बेव्हको’च्या म्हणण्यानुसार, ख्रिसमसच्या काळात दारूच्या विक्रीने नवे रेकॉर्ड तयार केले आहेत.
केरळने या वर्षी ओणमच्या काळात दारू खरेदीचा विक्रम केला होता. केरळ स्टेट बेव्हरेज कॉर्पोरेशननुसार, २१ ऑगस्टपासून सुरू झालेल्या दहा दिवसांच्या ओणम उत्सवादरम्यान केरळमध्ये मद्यविक्री सुमारे ७५९ कोटी रुपयांवर पोहोचली, तर २०२२ मध्ये ती ओणमदरम्यान सातशे कोटी रुपयांपर्यंत पोहोचेल. राज्य सरकारला सुमारे ६५ कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे.