इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
हिमाचलच्या लाहौलमधील चंद्रा नदीत पर्यटक कार चालवतानाचा एक व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. नाताळ व नववर्षानिमित्त पर्यटकांनी मोठ्या संख्येने हिमाचलमध्ये गर्दी केल्यामुळे या कारचालकाने नवा मार्ग शोधला आहे.
पर्यटकांनी एकाच वेळी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्यामुळे येथे ट्रॅफिक जॅम होण्याचे प्रमाण वाढले आहे. रस्ते वाहनांनी भरले आहे. त्यामुळे या पठ्ठयाने थेट नदीतूनच कारला रस्ता करत आपली एसयूव्ही चालवत नेली.
खरं तर नदीची पाण्याची पातळी कमी असल्यामुळे हे शक्य झाले. पण, पाण्याची पातळी जास्त व एखाद्या ठिकाणी खोल खड्डा जर असता तर ही गाडी पाण्यात चालवणे त्याला चांगलेच महागात पडले असते.