गुरूवार, ऑगस्ट 7, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील लेकीचे मोठे यश…क्लास न लावता एमपीएससी उत्तीर्ण

by Gautam Sancheti
डिसेंबर 25, 2023 | 8:30 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
IMG 20231225 WA0330


विजय वाघमारे, जळगाव
जळगाव – धरणगाव तालुक्यातील दोनगाव येथील भारती रविंद्र पाटील हीने ओबीसी महिला प्रवर्गातून तिसरी रॅक मिळवित एमपीएससीच्या परिक्षेत यश मिळवले आहे. भारतीला वर्ग १ मध्ये दुय्यम निबंधक म्हणून नियुक्ती मिळाली आहे. सर्वसामान्य कुटुंबातील शेतकऱ्याच्या लेकीने यश मिळविले ते देखील सेल्फ स्टडी करून, त्यामुळे तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

घरीच अभ्यासाची स्वतंत्र खोली केली तयार !
धरणगाव तालुक्यातील दोनगाव येथील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात भारती रविंद्र पाटील हीचा जन्म झाला. गावातीलच शाळेत प्राथमिक व माध्यमिक शिक्षण घेतल्यानंतर भारतीने बीएससी मॅथमॅटीक्समध्ये पदवीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर २०१८ पासून आपल्या उराशी बाळगलेले प्रशासकीय सेवेचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अभ्यासाला सुरुवात केली. सहा महिने क्लास लावून अभ्यासाची पद्धत जाणून घेतली, मात्र त्यानंतर भारती होने घरीच अभ्यासाची स्वतंत्र खोली तयार करुन घेत सेल्फस्टडीला सुरुवात केली.

ओबीसी प्रवर्गातून मिळवली तिसरी रँक !
२०२१ मध्ये झालेल्या एमपीएससीच्या परिक्षेच्या पुर्वपरिक्षेत ‘भारतीला अपयश आले. मात्र ती खचून न जाता तीच्या कुटुंबियांनी दिलेल्या आधारावर पुन्हा दिवसरात्र अभ्यास सुरु ठेवला, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पूर्व परिक्षा पास झाल्यानंतर मुख्य परिक्षेची तारीख जाहीर होत नव्हती. परंतू अशा परिस्थिीत खचून न जाता ‘भारती हीने मुख्य परिक्षेच्या केवळ ४० ते ५० दिवस अगोदर अभ्यास करीत ओबीसी महिला प्रवर्गातून तिसरी रैंक मिळवीत यशाचे शिखर गाठले. यशात आई, वडीलांसह शिक्षकांचा मोलाचा वाटा वडील उच्चशिक्षीत शेतकरी रविंद्र पाटील असून ते राजकारणात देखील सक्रीय आहेत.

आई-वडील पाठीशी खंबीरपणे राहिले उभे !
अभ्यासक्रमात असलेल्या कायदेविषयक क्लिष्ट अभ्यासक्रमाविषयी श्रेयस बढे यांचे मार्गदर्शन मिळाले. तसेच अपयश आल्यानंतर देखील पाठीशी खंबीरपणे उभ्या असलेल्या आई, वडीलांसह अभ्यास करतांना येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी लहान भावाचा देखील मोलाचा वाटा असल्याची भावना भारती पाटील यांनी व्यक्त केली.

तिसऱ्या प्रयत्नात उमटवली यशाची मोहर !
प्रशासकीय सेवेत जाण्यासाठी अभ्यास करीत असतांना भारती पाटील यांना अनेक अडचणी आल्या. परंतू त्यांनी अडवणींवर मात करीत दिवसभरातील पाच ते सहा तास अभ्यास हा त्यांचा नित्यक्रम झाला होता, सोशल मीडियाचा देखील त्यांना अभ्यासात मोठा फायदा झाला असून अवघ्या तिसऱ्या प्रयत्नात त्यांनी एमपीएसी परिक्षेत यश संपादन करीत दुय्यम निबंधक पदावर आपल्या यशाची मोहर उमटवली.

दोन वेळा सोडली पीएसआयची नोकरी !
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून २०२० मध्ये जाहीरात काढण्यात आली. परंतू ही परिक्षा पोस्टपॉण्ड झाल्याने २०२२ मध्ये पीएसआय पदासाठी परिक्षा दिली. यामध्ये देखील भारती हीचा स्कोअर चांगला होता, मात्र तीला पीएसपदासाठी इच्छुक नसल्याने तीने पुन्हा अभ्यासाला सुरुवात केली. भारती पाटील हीचा अभ्यास सुरु असतांना तीचे दोन वेळेच पीएसआयच्या परिक्षेत्र यश संपादन केले असल्याचे तीने सांगितले.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुरस्कारचे वितरण….यांना मिळाला अटल संस्कृती गौरव पुरस्कार

Next Post

या ठिकाणी देशी बनावटीचे २ पिस्टल व ४ जिवंत काडतूसे जप्त…पोलिसांच्या विशेष पथकाची कामगिरी

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
Untitled 187

या ठिकाणी देशी बनावटीचे २ पिस्टल व ४ जिवंत काडतूसे जप्त…पोलिसांच्या विशेष पथकाची कामगिरी

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींची मनोकामना पूर्ण होतील, जाणून घ्या, गुरुवार, ७ जुलैचे राशिभविष्य

ऑगस्ट 6, 2025
देवगाव शनि हरिनाम सप्ताह सोहळा ३ 1024x527 1

सरला बेट विकास आराखडा व शनि देवगाव येथील बंधाऱ्यास मंजूरी देणार…मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ऑगस्ट 6, 2025
IMG 20250806 WA0367

नाशिक शहरात तोतया अन्न भेसळ अधिकाऱ्याचा धुमाकूळ…अशी करतो वसुली

ऑगस्ट 6, 2025
dada bhuse

आता विद्यार्थ्यांना पहिलीपासून एनसीसीच्या धर्तीवर प्रशिक्षण…शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

ऑगस्ट 6, 2025
Untitled 7

राज्यातील ५ ज्योतिर्लिंग विकास आराखड्यांच्या अंमलबजावणीसाठी वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांची नियुक्ती

ऑगस्ट 6, 2025
Untitled

ठाकरे ब्रॅण्ड…मुंबईत या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गट आणि मनसेची युती…

ऑगस्ट 6, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011