इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
संपत्तीसाठी पतीच्या हत्येचे षडयंत्र रचून सासरे व तीन दिरांना जेलमध्ये टाकणा-या महिलेचा डाव तिच्यावर उलटल्याची घटना उत्तर प्रदेशमधील गौंडा भागातील बैसिया या गावात घडली आहे. विशेष म्हणजे ज्या पतीचा हत्या झाल्याचे ती सांगत होती तो पती जिंवत असल्याचे सहा महिन्यानंतर पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. हा पती गुजराथ येथे मजदुरी करत असतांना पोलिसांनी शोध घेतला. त्यानंतर या प्रकरणात पोलिसांनी पती व पत्नी या दोघांना अटक केली आहे.
धक्कादायक अशी घटना असली तरी हे सर्व षडयंत्र पती व पत्नीने मिळून रचले होते. सहा महिन्यापूर्वी पती गायब झाल्यानंतर पत्नीने पतीची हत्या झाली असून त्याचे प्रेत सासरे व तीन दीरांनी लपवल्याचा आरोप केला. त्यानंतर तीने कोर्टात केस दाखल केली. यानंतर पोलिसांनी कारवाई सुरु केली. चारही जणांविरुध्द गुन्हा दाखल केला. त्यानंतर पती रामकरण याचा शोध सुरु झाला.
पोलिसांनी सर्व तपास केल्यानंतर त्यांना काहीच धागेदोरे हाती लागले. त्यामुळे पोलिसांचा संशय संपत्तीकडे गेला. त्यानंतर त्यांनी त्या दिशेने तपास केल्यानंतर या हत्येचा उलगडा झाला. पत्नीचे नाव गुडीया असून तीच्या पतीचे नाव रामकरन आहे. दोघांनी मिळून हे षडयंत्र रचल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांनी दोघांना अटक केली. त्यानंतर पती व पत्नी विरुध्द १९४ सीआरपीसी आणि १८२ सीआरपीसी अन्वये कारवाई केली आहे.