माणिकराव खुळे, हवामानतज्ञ
२२ डिसेंबर पासून सध्या ख्रिस्तमसला थंडीचा अनुभव येत आहे. २९ डिसेंबरला पुन्हा एक नवीन प. झंजावातातून वर्षाखेर ३० डिसेंबरपर्यंत महाराष्ट्रात थंडी जाणवेल. कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्रात सध्याचे पहाटेचे किमान तापमान १२ डिग्री से. ग्रेडच्या तर मुंबईसह कोकणात हे १७ डिग्रीच्या आसपास असू शकते.
२९ डिसेंबरला उत्तर भारतातून येणाऱ्या प. झंजावातातून जमिनीपासून उच्च पातळीवर थंडी व दक्षिण भारतातून महाराष्ट्रपर्यंत निम्न पातळीतून पोहोचणाऱ्या पूर्वझोती वाऱ्यांच्या मिलाफातून फक्त मध्य महाराष्ट्रातील खान्देश, नाशिक नगर ते सोलापूर पर्यंतच्या १० जिल्ह्यात व धाराशिव व लातूर अश्या १२ जिल्ह्यात ३१ ते २ जानेवारी या तीन दिवसा दरम्यानच्या नववर्षात ढगाळ वातावरण जाणवेल. त्यामुळे काहीशी थंडी ओसरून ऊबदारपणा जाणवेल.
मध्य महाराष्ट्रातील या १० जिल्ह्यात पावसाची शक्यता फारच कमी असून झालाच तर मध्य प्रदेश लगत खान्देशातील शिरपूर शहादा चोपडा यावल रावेर तालुक्याच्या तुरळक भागात ३१ डिसेंबर ते २ जानेवारी दरम्यानच्या ३ दिवसात अगदीच तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता जाणवते. अन्यथा नाही.
माणिकराव खुळे
Meteorologist (Retd.)
IMD Pune.