नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँकेच्या २०२३ ते २०२८ या पंचवार्षिक निवडणुकीत प्रगती पॅनलचे २१ उमेदवार आज निवडून आले. याअगोदरच महिला गटासाठी राखीव असलेल्या दोन उमेदवारांची बिनविरोध निवड झाली होती. त्यानंतर १९ जागेसाठी मतदान झाले. त्यात सर्वच जागेवर प्रगती पॅनलने विजय मिळवला.
या निवडणुकीत सोहनलाल भंडारी, वसंत गिते, विजय साने, गणेश गिते, नरेंद्र पवार, प्रफुल्ल संचेती, अविनाश गोठी, भानुदास चौधरी, आकाश छाजेड, रंजन ठाकरे, प्रकाश दायमा, हेमंत धात्रक, सुभाष नहार, देवेंद्र पटेल, महेंद्र बुरड, ललितकुमार मोदी, हरीश लोढा, अशोक सोनजे ( सर्वसाधारण गट), प्रशांत दिवे (अनुसूचित जाती-जमाती राखीव) यांचा आज विजय झाला. तर सपना बागमार, शीतल भट्टड या अगोदरच बिनविरोध निवडून आल्या होत्या.
या निवडणुकीत सर्वसाधारण गटाच्या १८ जागांसाठी २४ उमेदवार, तर अनुसूचित जाती-जमातीच्या एका जागेसाठी दोन उमेदवार रिंगणात होते. निवडणुकीच्या रिंगणात एकूण २७२ अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवसापर्यंत २८ उमेदवार रिंगणात उरले. त्यापैकी २१ उमेदवार सत्तारुढ प्रगती पॅनलचे होते. त्यांचा एकतर्फी विजय झाला.
या निवडणुकीत सहकार पॅनलचे उमेदवार संदीप भवर, महेंद्र गांगुर्डे, सुधाकर जाधव, संजय नेरकर, विजय बोरा, कपिलदेव शर्मा विलास जाधव यांचा पराभव झाला.