नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – १ जानेवारीपासून काय बदल होतील याची माहिती सहकार भारतीचे उपाध्यक्ष डॉ प्रशांत पुरंदरे यांनी दिली आहे.
ते श्री समर्थ सहकारी बँकेचे माजी चेअरमन आहे. सर्वांना २०२४ मधील नवीन नियम काय आहे हे माहिती असणे गरजेचे आहे. त्यामुळे ही माहिती त्यांनी दिली आहे.
१)सेबीचा नवा नियम
जर तुम्ही शेअर बाजारात पैसे गुंतवलेत तर तुम्ही 31 डिसेंबरपूर्वी नॉमिनी जोडावे लागतील, कारण सेबीने 31 डिसेंबर ही डिमॅट खात्यात नॉमिनेशनची अंतिम तारीख दिलीये. जर नॉमिनी जोडला गेला नाही तर, डिमॅट खातं गोठवलं जाऊ शकतं.
२)लॉकर करार
आरबीआयने सर्व बँकांना लॉकर करार सुधारित करण्याचे आदेश दिले होते. त्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर होती. जर तुम्ही असं केलं नाही तर बँक लॉकर खाली करावं लागेल.
३)SBI मध्ये एफडी तर नाही?
स्टेट बँक ऑफ इंडियाची अमृत कलश मुदत ठेव योजना देखील 31 डिसेंबर 2023 रोजी बंद होणार आहे. 400 दिवसांची एफडी ज्यावर 7.60 टक्के व्याज मिळतं. ते आता बंद होणार आहे.
४)इन्कम टॅक्स रिटर्न भरला का?
जर तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न भरला नसेल तर तुम्हाला अडचणीचा सामना करावा लागणार आहे. आयकर विभागाने 31 जुलै 2023 ही शेवटची तारीख निश्चित केली होती, परंतु अनेक करदात्यांनी अद्याप आयटी रिटर्न भरले नाहीत. 31 डिसेंबर 2023 पर्यंत विलंब शुल्कासह अद्यतनित आयटीआर दाखल करावा लागणार आहे. अन्यथा दंड भरावा लागेल.
५)तुमचा युपीआय बंद होणार?
जर तुम्ही तुमच्या कोणत्याही एका युपीआय आयडीवरून कोणतंही पेमेंट केलं नसेल तर आत्ताच एक पेमेंट करा. कारण पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने काही युपीआय आयडी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. एक वर्षापासून वापरले जात नाहीत असे युपीआय बंद केले जातील.
नव वर्षाच्या शुभेच्छा
डॉ प्रशांत पुरंदरे
उपाध्यक्ष सहकार भारती नाशिक
माजी चेअरमन श्री समर्थ सहकारी बँक नाशिक