नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुंबई- आग्रा महामार्गावर विल्होळी जवळ आल्टोच्या अपघातात आठ जण गंभीर जखमी झाले आहे. रविवारी रात्री साडेअकरा वाजता हा अपघात झाला. नाशिककडून मुंबईकडे जाणा-या अज्ञात वाहनाने विल्होळी जैनमंदिर जवळ आल्टो कारला मागून जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला.
या अपघात आल्टो कार क्रं MH.14.JM.1461 या वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेत आठ जण जखमी झाले आहे. यात आशाबाई तानाजी सहाने (५५), मंदाबाई निवृत्ती कोकणे (४६), तानाजी गोविंद सहाने (४३), मेघा प्रदिप सहाणे (२५), मनस्वी प्रदिप सहाने (३), प्रदिप सहाने (४३), दिदी विनोद सहाने (१३), साहिल विनोद सिरसाट (१२) रा. आंबे बहुला, नाशिक ही जखमींची नावे आहे.
या अपघाताची माहिती फोनवर मिळताच गोंदे फाटा स्पॅाटवर उभी असलेली जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानची मोफत रुग्णवाहिका लगेचच अपघात स्थळी पोहोचली. त्यानंतर जखमींना तात्काळ खासगी हॅास्पिटलमध्ये दाखल केले.