नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – चांदवड तालूक्यातील चांदवड-मनमाड राज्य महामार्गावर जिलेटींग कांड्या(स्फोटके) भरून जात असलेला ट्रक पोलिसांनी पकडला. या घटनेत ८ लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या ट्रकची माहिती जिल्हा पोलिस अधिक्षकांच्या विशेष पोलिस पथकाला मिळाल्यानंतर या पथकाने पेट्रोल पंपावर डिझेल भरण्यासाठी थांबलेल्या दहा टायरच्या ट्रकची चौकशी केली. त्यात जिलेटीनच्या पिशव्या आढळून आल्या.
या पिशवीत डायनेक्स प्राईमचे १०० आणि डायनेक्स पावरचे ४० बॉक्स असे ९४०० हजार रुपयांचे विस्फोटक आढळून आले. त्यानंतर पोलिसांनी ट्रकसह सुमारे ८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. हे स्फोटके नेमके कुठून आणले आणि कुठे घेऊन जात होते याचा चांदवड पोलिस अधिक तपास करीत आहे.