इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
अलवरमधल्या खैरथल तिजारा जिल्ह्यातल्या शेखपूरमध्ये हिटरमुळे संपूर्ण कुटुंबाला जीव गमवावा लागल्याची दुर्दैवी घटना घडली. थंडीचे दिवस असल्यामुळे हा रुम हिटर लावला होता. पण, या हिटरने तीघांचा बळी घेतला. या घटनेत पती, पत्नी व दोन महिन्याच्या मुलीचा मृत्यू झाला आहे.
दीपक यादव, संजू यादव त्यांची मुलगी निशिका यादव हे मृत झालेल्या तिघांची नावे आहे. या घटनेत दीपक व मुलीचा जागीच मृत्यू झाला तर पत्नी संजूला रुग्णालयात दाखल केल्यानंतर उपचार सुरु असतांना मृत्यू झाला. मुंडाना गावाचा रहिवासी असलेला दीपक आणि जयपूरच्या संजू यादव यांचा दोन वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. त्यांना दोन महिन्याची मुलगी निशिका होती. तिघांचाही या घटनेत मृत्यू झाला.
शुक्रवारी रात्री हे तिघेही घरी झोपलेलेल असतांना ही घटना घडली. थंडी कडाक्याची असल्यामुळे त्यांनी त्यांनी रात्री हिटर सुरू केला आणि त्यांना झोप लागली. या हिटरमुळे कापसाच्या गादीने भेट घेतल व आगीने रौद्ररुप धारण केले. त्यात या तिघांनाही जीव गमवावा लागला.