नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कोरोनाचे भारतात नवा व्हेरिएंटचे ३ हजार ७४२ रुग्ण आढळले आहे. ही संख्या वाढत असल्यामुळे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नागरिकांनी घाबरून न जाता, कोरोना प्रतिबंधक आणि सुरक्षाविषयक नियमांचे पालन करत राहावे असे आवाहन केले आहे.
या अगोदर कोरोनाच्या या व्हेरिएंटमुळे एकाचा मृत्यू झाल्यानंतर. जागतिक आरोग्य संघटनेने भारताला धोक्याचा इशारा दिला. त्यानंतर आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी राज्याच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर मॉक ड्रिल करण्यात आले. मुखपट्टी, ऑक्सिजन सिलिंडर, औषधे आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा भासू नये, यासाठी तयार राहण्याचे निर्देश केंद्र सरकारने राज्यांना दिले आहेत. एकुणच कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचे संकट आले असून त्यासाठी नागरिकांनी सावध राहणे गरजेचे आहे.
मुख्यमंत्र्यांनी चार दिवसापूर्वी घेतली बैठक
देशात आणि राज्यात सध्या जेएन-वन हा कोरोनाचा नवा व्हेरिएंट आढळून आला आहे. यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरोग्य यंत्रणा तसेच जिल्हाधिकारी यांची बैठक घेतली होती. त्यात राज्यभरातील आरोग्य संस्थांचे स्ट्रक्चरल, इलेक्ट्रीक आणि फायर ऑडीट करण्यात यावे. त्याचबरोबर रुग्णालयांमध्ये विलगीकरण आणि ऑक्सिजन बेडस् यांची यंत्रणा सज्ज ठेवावी. नागरिकांनी घाबरून न जाता कोरोना प्रतिबंधात्मक सूचनांचे पालन करावे, राज्यभरातील यंत्रणा सज्ज असल्याची ग्वाहीही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.