इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
लग्न सोहळ्यात नेहमी आपण रुसवे फुगवे बघतो. बहुतांश लग्नात नवरदेवाचे व वर पक्षाचे रुसवे जास्त असतात. पण, आता जमाना बदलला आहे. त्यामुळे नवरदेवापेक्षा नवरीच रुसते व त्यातून काय होतं हे सांगायला नको. दोन वेगवेगळ्या लग्नामध्ये नवरीचा रुद्रावतार बघायला मिळतो. एका लग्नात तर वराने वधुच्या गळ्यात माळ टाकल्यानंतर नवरी थेट त्याच्या थोबाडात मारते. तर दुस-या लग्नात नवरी नवरदेवार इतकी भडकते की ती नव-याला धक्का देते.
ज्या लग्नात नवरी थोबाडीत मारते त्या लग्नात नवरदेवाची चुक आहे. तो दारु पिऊन थेट मंडपात येतो. त्यामुळे नवरीचा पारा चढतो. तीला स्टेजवर दारुचा वास येतो व ती नव-याच्या कानाखाली वाजवते. पण, दुस-या लग्नात एकमेकांना ढकल्यावरुन संताप दिसतो.
काहीही असो पण, हे दोन्ही व्हिडिओ मजेशीर वाटत असले तरी लग्नात नवरदेवाने काय सावधगीरी बाळगायला हवी हे सांगणारे आहे. त्यामुळे हे व्हिडिओ बघतांना गमंत म्हणून नाही तर लग्नात काय नियम पाळावे हे सांगणारे आहे.