दिंडोरी (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – येथील शेतक-यांनी टोमॅटोला भाव मिळत नसल्याने बाजार समितीसमोर नाशिक वणी रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन केले. त्यानंतर रस्त्यावर टोमॅटो ओतून शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला.
गेल्या काही दिवसापासून टोमॅटोला भाव मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत आहे. रास्ता रोको आंदोलन करत टोमॅटोला हमीभाव देण्याची शेतकऱ्यांनी केली मागणी केली आहे. अचानक शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केल्याने नाशिक वणी रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
याअगोदर टोमॅटोचे भाव वाढले होते.पण, त्यावेळेस आवक कमी होती. त्याचा फायदा काही शेतक-यांना झाला. पण, सर्वांना त्याचा फायदा झाला नाही. आता आवक मोठी असतांना भाव मात्र कमी आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत आले असून त्यांचा संताप आता वाढू लागला आहे.