पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– लैंगिंक अत्याचाराच्या घटना मोठ्या प्रमाणात कुटुंबात घडत असल्याचा एका सर्वेत आले होते. पण, या घटनेत फारशा तक्रारी होत नाही. त्याचे कारण नाते आडवे येते. पण, पुण्यात एका घटनेत मात्र तक्रार झाली व मामीला थेट अटकही. पुणे जिल्ह्याती ही घटना असून येथे सख्ख्या मामीनेच भाचीला विवस्त्र करून लैंगिक अत्याचार केला. याप्रकरणी पोलिसांनी मामीला अटक करण्यात आली.
अत्याचार झाला त्या वेळी पीडित मुलगी नऊ वर्षाची होती. पीडित मुलगी मामाकडे राहण्यास आली होती. मामा कामाला गेल्यानंतर मामी भाचीला विवस्त्र करून मारहाण करत असे. फिर्यादी महिलेने कोरोना काळात तिच्या नऊ वर्षांच्या मुलीला भावाकडे राहण्यासाठी पुण्याला पाठवले होते. तिने मुलीचे विवस्त्र फोटो काढून तिला जीवे मारण्याची धमकी देत होती.
पीडित मुलगी मूळ गावी परतल्यानंतर तिने मामीने केलेला अत्याचार सांगितला. महिलेवर बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पोक्सो) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.