तुळजापूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कोणती नेमणूक करतांना अगोदर शहनिशा केली जाते. पण, तुळजापुर येथे ती न केल्यामुळे थेट दागिणे चोरणा-या आरोपीलाच शासकीय समितीत घेतले आहे. तुळजाभवानीच्या अंगावरचे दागिने चोरणाऱ्यांत सहा जणांचा समावेश आहे. त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल झाले आहेत. त्यातील एकमेव जिवंत आरोपी असलेले चिलोजी बुवा फरार आहेत. एकीकडे पोलिस त्यांचा शोध घेत असताना दुसरीकडे सरकारने मात्र त्यांची शासकीय समितीवर वर्णी लावली आहे.
तुळजाभवनी मंदिरात काही अलंकार नव्याने ठेवण्यात आले आणि वर्षानुवर्षाचे पांरपारिक दागिने गायब करण्यात आले. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. चिलोजीबुवा फरार आहेत. तुळजाभवानी देवी मंदिरात प्रवेशासाठी बायोमेट्रिक प्रणाली तयारी करण्यासाठी नियमावली तयार करण्यासाठी ११ जणांची शासकीय समिती करण्यात आली. त्यात फरार आरोपी चिलोजी बुवांचा समावेश आहेत.
चिलोजी बुवा यांच्यावर तुळजाभवानी मंदिरातील पुरातन दागिने, सोने, चांदी, अलंकार चोरी प्रकरणी गुन्हा दाखल आहे. पोलिस त्यांच्या मागावर आहेत, तरीही त्यांना शासकीय समितीत घेण्यात आले आहे. या समितीत इतर मठाच्या महंतांचा समावेश आहे. या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी विशेष पोलिस पथकाची निर्मिती करण्यात आली आहे.