भुसावळ (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – रेल्वे कारखातून पॉवर केबल चोरी प्रकरणात भुसावळ रेल्वे सुरक्षा बलाच्या दोन पोलिसांवर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत दोघांना निलंबित करण्यात आले असून एकाला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात चार संशयित आरोपींना गजाआड करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. रेल्वेच्या पीओएच कारखान्यातून ८ लाखांची महागडी ही पॅावर केबल चोरी संगणमताने चोरी केल्याचे तपासात समोर आल्यानंतर ही मोठी कारवाई करण्यात आली आहे.
१६ डिसेंबरला ही चोरीची घटना उघडकीस आली आहे. त्यात कारखान्यातून १६०४ किलो पॉवर केबल चोरीचे समोर आले. या केबलची किंमत ७ लाख ९४ हजार २२७ रुपये आहे. याप्रकरणी आरपीएफचे पोलिस शशिकांत गणपत सुरवाडे यांच्यासह सचिन उत्तम तायडे (२५, महादेव टेकडी, कंडारी, ता. भुसावळ), राहुल रतन मोरे (२३, महादेव टेकडी, कंडारी, ता. भुसावळ) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. त्यानंतर या चौघांना भुसावळ रेल्वे न्यायालयात हजर केले असता २४ डिसेंबर पर्यंत आरपीएफ कोठडी सुनावण्यात आली.
या घटनेत कसून तपास केल्यानंतर आणखी एका आरोपीचे नाव समोर आले. त्यानंतर आरपीएफने कुणाल लक्ष्मण मोरे (१९, महादेव मंदिराजवळ, कंडारी, ता. भुसावळ) याला अटक केली आहे. या केबल चोरीनंतर मिळालेल्या पैशातून अर्धा हिस्सा हवालदार शशिकांत सुरवाडे यांनी घेतला. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली. तर सुरवाडे बरोबर असणा-या एका आरपीएफच्या पोलिसालाही निलंबीत करण्यात आले आहे.