मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- दोन बहिणींना वेश्याव्यवसायात ढकलणा-या श्वेता गोवळकर (३४) या दलाल महिलेला मुलुंड पोलिसांनी गजाआड केले आहे. आर्थिक परिस्थितीचा फायदा घेत या महिलेने या अल्पवयीन मुलीला या व्यवसायात ढकलले. विशेष म्हणजे या दोन मुलीपैकी एकाचे १४ तर दुसरीचे वय १७ वर्ष आहे.
मुलुंड पोलिसांनी या दोन्ही मुलींची सुटका करुन त्यांना बाल सुधारगृहात पाठवले आहे. याप्रकरणात दलाल महिलेविरुध्द अपहरण व पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या महिलेची पोलिसांनी चौकशी केल्यानंतर ती ठाणे परिसरात राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली असून ती मोलकरीण आहे. अल्पवयीन मुलींना पैशांचे आमिष दाखवत ग्राहकांकडे ती पाठवत होती.
असा उघड झाला प्रकार
या प्रकरणात मुलुंड पोलिसांनी गुरुवारी दुपारच्या सुमारास मुलुंड चेकनाका येथील एका हॉटेलमधून या मुलींची सुटका केल्यानंतर हा प्रकार प्रकार समोर आला. त्यानंतर श्वेताचे कारनामे समोर आले. पोलिस या महिलेची कसून चौकशी करत असून अजून किती मुलींना तीने वेशा व्यवसायात ढकलले आहे. याची माहिती घेत आहे.