नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बीडच्या इशारा सभेत मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या टीकेनंतर मंत्री छगन भुजबळ यांनी या टीकेला उत्तर दिले. ते म्हणाले, आजचे भाषण अर्धे माझ्यावर होते. भुजबळवर नाही बोलले तर बोलणार काय हा प्रश्न आहे. काल मी त्यांच्या बोलण्याला पाठिंबा दिला होता. पण, ते एकाच भाषणात दुहेरी बोलत आहेत. बीड मध्ये जे झाले ते भुजबळांनी केले आहे असा त्यांनी आरोप केला. मराठांच्या वाट्याला गेला तर काय होतोय हे तुम्ही लक्षात ठेवा, असे देखील ते बोलले. म्हणजे बीडमध्ये जे झालंय ते तुम्ही मान्य केले.
यावेळी त्यांनी सांगितले छगन भुजबळ अशा गोष्टींना घाबरत नाही. तुमच्या जन्माच्या आधीपासून मी लढत आहे. मी पण बोलू शकतो की तुम्ही बे….पुढे बोलणे टाळले. भाषणात ते घेऊन बोलल्यावर कदाचित दोनदा ते बोलतात असा चिमटाही त्यांनी काढला. तीन कोटी नागरिक पंढरपूरच्या यात्रेला देखील नसतात. जनगणना करा मग कळेल कोण किती आहेत. लोकशाही मार्गाने आंदोलन करा, पण घर जाळून नका सध्या ते जाळपोळ करत आहेत हे सगळ्या महाराष्ट्राने पाहिले आहे असेही ते म्हणाले.
यावेळी एक चांगली बातमी आहे,गायकवाड समितीने जे बिल आणले होते ते उच्च न्यायालयात मंजूर केले होते. आता त्याच संदर्भात सुप्रीम कोर्टात क्युरीटीव पीटिशन दाखल झाले आहे. ही एक खूप मोठी बातमी आहे, २४ तारखेपासून यावर सुनावणी होणार आहे. मी पहिल्यापासून सांगतोय की मराठा समजाला वेगळं आरक्षण दिले पाहिजे असेही त्यांनी सांगितले.