इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणा संदर्भात क्युरिटी पीटीशन स्वीकारलेली आहे. याबाबत याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी सांगितले की, २४ जानेवारीला या संदर्भात निकाल देण्यात येईल असे न्यायालयाने स्पष्ट केले. आज न्यायमूर्तींनी सही करून त्या संदर्भात आदेश दिलेला आहे मला विश्वास आहे मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकणार असेही ते म्हणाले.
एकीकडे मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन सुरु असतांना सर्वोच्च न्यायालयाने क्युरिटी पीटीशन याचिका स्विकारल्याची बातमी आली आहे. त्यामुळे जरांगे पाटील आता आपल्या आंदोलनाच्या भूमिकेवर काय सांगतात हेही महत्त्वाचे आहे.
क्युरेटिव्ह पिटीशन मुळे आजवर अनेकांना न्याय मिळाला आहे. अगदी देश विघातक कारवाई करणाऱ्या व्यक्तीला फाशीची शिक्षा रद्द होऊन जन्मठेपेच्या शिक्षेत त्याचे रूपांतर झाले आहे. त्यामुळे या याचिकेकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षण दिले होते. ते नंतर रद्द झाले. पण, सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा संधी दिल्यामुळे सर्वांच्या आशा उंचावल्या आहे.