इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नवी दिल्लीः एकीकडे ईडीच्या नोटीसवरुन अरविंद केजरीवाल यांच्या अडचणी वाढलेल्या असतांना दुसरीकडे दिल्लीचे उपराज्यपाल विनय सक्सेना यांनी आणखी एका प्रकरणात केंद्रीय अन्वेषण ब्यूरो (सीबीआय तपास)ला तपासाचे आदेश दिले आहेत. हे आदेश दिल्ली सरकारने रुग्णालयांसाठी खरेदी केलेल्या औषधांच्या प्रकरणाच्या चौकशीचे आहेत. लोकसभा निवडणुकीपूर्वी दिल्लीतील आम आदमी पक्षाच्या सरकारला कसे अडचणीत ठेवायचे यासाठी भाजपची ही रणनिती असलल्याचे बोलले जात आहे. त्यात केजरीवाल अडकणार अशी चिन्हे आहेत.
दिल्लीतील आपच्या सरकाराने सरकारी रुग्णालयांसाठी औषधांची मोठ्या प्रमाणात खरेदी केली. यातील काही औषधे सरकारी आणि खासगी प्रयोगशाळांमधील चाचणीदरम्यान निकामी झाल्याचे आढळून आले आहे. सरकारी रुग्णालयांवर विनापरवाना औषधांचा पुरवठा केल्याचा आरोप आहे. उपराज्यपालाने आता सरकारने खरेदी केलेल्या अप्रमाणित औषधांबाबत हे आदेश दिले आहेत. ‘आप’ सरकारने हॉस्पिटलसाठी चुकीच्या पद्धतीने पद्धतीने औषधांची खरेदी केली होती. सरकारी आणि खासगी चाचणी प्रयोगशाळांमधील चाचण्यांदरम्यान ही औषधे निकषांची पूर्तता करण्यात अयशस्वी ठरली आहेत.
एकीकडे ईडीने उत्पादन शुल्क धोरण प्रकरणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दुसऱ्यांदा समन्स बजावले असतांना हे नवे प्रकरण आले आहे. हे सर्व दिल्लीत सुरु असतांना अरविंद केजरीवाल मात्र पंजाबमधील होशियारपूरमध्ये विपश्यना शिबिरात आहेत.