नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- प्रेमातून विवाह झाला नाही तर पुढे कोण कसा त्याचा वापर करेल व त्यातून कसे अंगलट येत हे सांगता येत नाही. नाशिकमध्ये विवाहपूर्वीच्या प्रेमप्रकरणातील अश्लिल फोटो पतीस दाखविण्याची धमकी देत एकाने विवाहीतेवर वेळोवेळी बलत्कार केल्याची घटना समोर आली आहे. सलग तीन वर्षापासून हा प्रकार सुरू असून अतिरेक वाढल्याने विवाहीतेने अखेर पोलिसात धाव घेतली आहे. याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस संशयिताचा शोध घेत आहेत.
स्वप्नील शार्दुल (३१ रा.मरीमाता मंदिरामागे,समतानगर टाकळीरोड) असे संशयिताचे नाव आहे. नाशिकमध्ये राहणा-या पीडितेने याबाबत तक्रार दाखल केली आहे. विवाहापूर्वी पीडितेचे आणि संशयिताचे ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाल्याने प्रेमसंबध जुळले होते. त्यावेळी एकमेकांसोबत दोघांनी फोटोही काढले होते. यानंतर पीडितेचा विवाह झाला. सुखाने तिचा संसार सुरू असतांनाच जानेवारी २०२१ मध्ये संशयिताने पीडितेचे घर गाठले. यावेळी त्याने प्रेमप्रकरणाबाबत पतीस सांगण्याबरोबरच फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर बलात्कार केला.
यानंतर सलग तीन वर्ष पती घरात नसतांना तो वेळोवेळी येऊन जबरदस्तीने अत्याचार करीत होता. सुखी संसार असल्याबाबत समज देवूनही तो ऐकण्याच्या मनस्थित नव्हता. याबाबत शेजारी पाजारीही कुजबुज सुरू झाल्याने पीडितेने त्यास समजून सांगण्याचा प्रयत्न केला असता तो ब्लॅकमेल करू लागला. संशयिताचा अतिरेक वाढल्याने अखेर विवाहीतेने पोलिसात धाव घेतली असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक पाटील करीत आहेत.