मंगळवार, जुलै 8, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

पुण्यात ससून रुग्णालयात मोफत शस्त्रक्रिया सेवेअंतर्गत लठ्ठपणा कमी करण्याची बॅरिएट्रिक शस्त्रक्रिया यशस्वी

by Gautam Sancheti
ऑक्टोबर 5, 2023 | 7:27 pm
in संमिश्र वार्ता
0
Screenshot 20231005 192147 WhatsApp 1

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पुणे- ससून सर्वोपचार रुग्णालयात मोफत शस्त्रक्रिया सेवेअंतर्गत गेल्या २ महिन्यात ८ पेक्षा अधिक बेरिएट्रिक शस्त्रक्रिया (लठ्ठपणा कमी करण्याची शस्त्रक्रिया) यशस्वी केल्या असून याअतंर्गत एका ३३ वर्षीय तरुणाची बॅरिएट्रिक सर्जरी आज ससून रुग्णालयात करण्यात आली.

ससून रुग्णालयात अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली गेले १० महिने मोफत शस्त्रक्रिया रुग्णसेवेत आणली आहे. हर्निया, पित्ताशय, अपेंडिक्स, मुळव्याधी, बेरिएट्रिक सर्जरी अशा अनेक प्रकारच्या शस्त्रक्रिया ससूनमध्ये मोफत केल्या जातात. स्थूलत्व जनजागृती अभियानांतर्गत बॅरिएट्रिक सर्जरी करण्यात आल्या आहेत.

सोलापूर येथील ३३ वर्षीय तरुण रुग्ण गेले अनेक वर्ष लठ्ठपणामुळे त्रासलेला होता. वाढत्या वजनामुळे थकवा, काम करण्यास आळस या सोबतच रुग्णाला रक्तदाब, मधुमेह, संधिवात व हृदयरोगाचादेखील धोका होण्याची शक्यता डॉक्टरांमार्फत दर्शविण्यात आली होती. रुग्णाचे अतिरिक्त काम हे बसून असल्यामुळे व व्यायामाचा अभाव असल्यामुळे त्यांचे वजन वाढले होते. वाढत्या वजनावर बरेच उपाय करूनही त्यांना मनासारखे परिणाम मिळाले नाही.

ससूनमध्ये बॅरिएट्रिक सर्जरी होऊन वजन कमी झालेल्या एका व्यक्तीने दिलेल्या माहितीच्या आधारे ससूनमध्ये स्थूलत्व विभागअंतर्गत दर सोमवारी सुरु असलेल्या बाह्यरुग्ण विभागात रुग्णाने भेट दिली असता त्याला शस्त्रक्रियेबद्दल माहिती देण्यात आली.

रुग्णाने आपली बॅरिऍट्रिक सर्जरी करण्याचे ठरविले. त्यानुसार ३ ऑक्टोबर रोजी दाखल रुग्णावर आज अधिष्ठाता संजीव ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली शस्त्रक्रिया विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. अमेय ठाकूर, डॉ. चैतन्य गायकवाड व सहकाऱ्यांनी यशस्वीरित्या शस्त्रक्रिया केली.

या रुग्णावर बॅरिएट्रिक सर्जरीचा एक प्रकार असलेली ‘स्लीव्ह गॅस्ट्रेक्टॉमी’ प्रकारची शस्त्रक्रिया करण्यात आली. या शस्त्रक्रियेत जठराचा काही भाग रुग्णाच्या ‘बीएमआय’ला अनुसरून कमी करण्यात येतो. जेणेकरून भविष्यात आपल्या शरीराला पुरेल इतकेच अन्न रुग्ण सेवन करू शकतो. बॅरिऍट्रिक शस्त्रक्रिया ही जगभरात कॉस्मेटिक सर्जरी म्हणून ओळखली जात आहे. परंतु ह्या सर्जरीमार्फत रुग्णाच्या शरीराला होणाऱ्या धोकादायक आजारांपासून वाचविले जाऊ शकते व यामुळे ही शस्त्रक्रिया जीवनरक्षक शस्त्रक्रिया आहे, असे डॉ. अमेय ठाकूर म्हणाले.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

सुरत-चेन्नई ग्रीन फिल्ड महामार्गासाठी होणार भूसंपादन, केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी दिल्या या सूचना

Next Post

माजी नगरसेविकेवर बलात्कार…पुण्यातील धक्कादायक घटना

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
प्रातिनिधिक

माजी नगरसेविकेवर बलात्कार…पुण्यातील धक्कादायक घटना

ताज्या बातम्या

solar e1703396140989

मॉडेल सौर ग्राम स्पर्धेमध्ये राज्यातील ६३ गावांचा सहभाग…विजेत्या गावाला केंद्राकडून एक कोटी रुपयांचे अनुदान

जुलै 8, 2025
bus

एस.टी. कार्यशाळेतील भांडार खरेदीत घोटाळा…१५ अधिकाऱ्यांवर होणार कारवाई

जुलै 8, 2025
crime1

रिक्षातून शेतातील साहित्य चोरून नेणा-या दोघांना पोलीसांनी ठोकल्या बेड्या

जुलै 8, 2025
mahavitarn

महावितरणच्या २३ पैकी ६ कर्मचारी संघटनांचा उद्या एक दिवसाचा संप…

जुलै 8, 2025
band

उद्या भारत बंद…देशातील २५ कोटी कामगार आंदोलनात उतरणार…या सेवांवर होणार परिणाम

जुलै 8, 2025
Untitled 23

मंत्री प्रताप सरनाईकांना मोर्चात विरोध, ५ मिनिटांत निघावं लागलं…त्यानंतर दिले हे स्पष्टीकरण

जुलै 8, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011