प्राचार्य संजय बोरस्ते यांचे लाभले मार्गदर्शन
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– महाराष्ट्र शासन कौशल्य विकास विभाग अंतर्गत व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचनालय आयोजित तंत्र प्रदर्शनत नाशिक जिल्ह्यातून ३७ संस्था, ८८ प्रकल्प, ४४० विद्यार्थ्यांच्या सहभागा घेतला होता. या स्पर्धेत राज्य स्तरावर सहभागासाठी इंजिनिअरिंग नॉन मशीन गट, मशीन गट, नॉन इंजिनिअरिंग गटातून प्रथम, द्वितीय, तृतीय अशी निवड करण्यात आली.
नॉन मशीन गट
१) MVP ITI Nashik:- सोलर, विंड बेस वायरलेस चार्जिग स्टेशन
२) Gov.ITI Nashik:- आय ओ सी बेस इलेक्ट्रिक पोल सेफ्टी
३) Gov.ITI Nashik:- हेल्थ अँड जी पी एस ट्रॅकर
मशिन गट
१) Gov .ITI Dindori:- हॉट अँड कॉल्ड वॉटर डिस्पेन्सर
२)Gov. ITI Deola:- युटीलायझेशन ऑफ वेस्ट ऑईल इंजिन बर्नर
३) MVP ITI Nashik:- युज ऑफ हायड्रोजन फुअल् फॉर टू व्हीलर
नॉन इंजिनिअरिंग गट
१) Gov.ITI trimbak:- वेस्टर्न डिझाईन
२) Gov. ITI Nsk Girl:- पार्टीवेअर वेस्टर्न लूक
३) Gov.Girl ITI Nashik:- थर्ड आय फॉर ब्लाइंड
यात एमव्हीपी आयटीआयचे दोन प्रकल्पांची राज्य स्तरासाठी निवड झाली.
या निवडीबद्दल सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे यांच्या सह सर्व पदाधिकारी संचालक यांनी आयटीआयच्या प्राचार्य,शिक्षक व विद्यार्थी यांना शुभेच्छा देत अभिनंदन केले.