नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) मानवी तस्करी प्रकरणात ११ व्या आरोपीला अटक केली आहे. या अगोदर दहा परदेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे. गेल्या महिन्यात एनआयएने देशव्यापी छापे टाकल्यानंतर या तस्करीचा पर्दाफाश केला होता.
या प्रकरणात मुख्य आरोपी सौदी झाकीर हा फरार होता. गेल्या महिन्यातच एनआयएने त्याच्या घराची झडती घेतली होती. गुरुवारी त्याच्या कोची (केरळ) लपलेल्या ठिकाणाचा शोध घेत त्याला ताब्यात घेण्यात आले.
झाकीर हा भारत-बांगलादेश सीमेवरील बेनापोल मार्गे आरोपी बेकायदेशीरपणे भारतात आल्याचे तपासात समोर आले आहे. तो कर्नाटकातील बेंगळुरू शहरातील बेलंदूर भागात गेला होता. येथे त्याने कचरा संकलन आणि पृथक्करण युनिट स्थापन केले होते आणि इतर परदेशी नागरिकांना कामावर ठेवले होते, ज्यांनी सीमेवरून बेकायदेशीरपणे भारतात प्रवेश केला होता.
NIA ने ७ नोव्हेंबर २०२३ रोजी मानवी तस्करी प्रकरण (RC-01/2023/NIA/DLI) नोंदवले होते, काही कर्नाटक-आधारित व्यक्तींचा आसाम, त्रिपुरा आणि सीमेपलीकडील देशांमधील सुत्रधार आणि तस्करांशी संबंध असल्याच्या विश्वसनीय माहितीनंतर. भारत-बांग्लादेश सीमेवरून भारतात व्यक्तींच्या तस्करीमध्ये गुंतलेल्या मोठ्या नेटवर्कचा भाग म्हणून हे लिंकेज ओळखले गेले. तपासानुसार आरोपी सीमेपलीकडून तस्करी करणाऱ्या व्यक्तींना बनावट आधार कार्डही देत होते.
या प्रकरणात एनआयएने याआधी दहा परदेशी नागरिकांना अटक केली होती, कलम 120B, 370, 465 आणि 471 IPC आणि UA(P) कायदा, 1967 च्या कलम 18 नुसार नोंद करण्यात आली होती. NIA चा या प्रकरणाचा तपास सुरू अद्याप सुरु आहे. भारत-बांगलादेश सीमेवर सक्रिय असलेल्या विविध नेटवर्कद्वारे मानवी तस्करीचे रॅकेट चालवले जात असून ते उदध्वस्त करण्यात येणार आहे.