इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
राजकारण मतभेद असले तरी ठाकरे बंधु काही प्रसंगात एकत्र येत असतात. त्यामुळे राजकीय चर्चेलाही उधाण येते. शुक्रवारी असेच दोन्ही बंधु एकत्र आले. प्रसंग होता कौटुंबिक कार्यक्रमचा. राज ठाकरे यांच्या भाज्याचा साखरपुडा होता. त्यामुळे उध्दव ठाकरे व राज ठाकरे दोघेही एकत्र आले व त्यानंतर राजकीय चर्चाही सुरु झाल्या. एकमेकांना टोमणे मारणारे मात्र या कार्यक्रमात निवांत होते. त्यांचे फोटोही समोर आले आहे. पण, या दोघांमध्ये कोणताही राजकीय संवाद झाला नाही.
या कार्यक्रमात रश्मी ठाकरे आणि शर्मिला ठाकरे यांचीही भेट झाली. मुंबईतील दादर येथील एका सभागृहात हा साखरपुडा पार पडला, ज्यात संपूर्ण ठाकरे कुटुंबीय उपस्थित होते. यावेळी उद्धव ठाकरे यांनी संपूर्ण ठाकरे कुटुंबीयांची भेट घेतली. या कार्यक्रमा दरम्यान राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांमध्ये काही काळ संवाद झाला.
खरं तर या दोन्ही भावांनी एकत्र यावे असे वारंवार बोलले जाते. मध्ये तर जाहीर पोस्टरही सर्वांनी लावले. पण, त्यानंतर पुढे काहीच झाले नाही. पण, कौटुंबिक कार्यक्रमात का होईना हे दोघे बंधु एकत्र आले. आता ते राजकारणात केव्हा एकत्र येतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.