इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
हुंडाबंदीचा कायदा सरकारने किती कडक केला असला तरी तो वेगवगेळ्या मार्गाने घेतला जातोच. पण, उत्तरप्रदेशमधील बुलंदशहर येथे असाच हुंड्याचा प्रकार समोर आला असून तो नवरदेवाच्या चांगलाचा अंगलट आला आहे. या विवाहसोहळ्यात नवरदेवाने थेट कारच मागितली होती. वधु पक्षाने ती देण्याचे मान्यही केले होते. पण, लग्नात क्रेटा कार देण्याऐवजी स्विप्ट कार दिल्यामुळे नवरदेव नाराज झाला. त्याने थेट लग्नास नकार दिला. त्यानंतर वधु पक्षाने थेट नवरदेवासह व-हाडाला बंदी केले.
या घटनेने चांगलीच खळबळ निर्माण झाली. वधु पक्षाने लग्नाचा खर्च मागणे सुरु केले. त्यानंतर वर पक्षाने ते देण्याचे मान्य केले. समाजातील काही प्रतिष्ठीत लोकांनी ही मध्यस्थी केली. त्यानंतर १७ लाख ३५ हजार खर्च वर पक्षाने देण्याची तयारी दाखवली. विशेष म्हणजे रात्रीच १२ लाख दिले व उर्वरीत पैशासाठी कार व काही दागिने गहाण ठेवले.
या लग्नाचे हे व-हाड गाजियाबाद जवळील भोजपुर येथून बुंदलशहरा जवळील बागवाला येथे आले होते. त्यानंतर हे लग्न केवळ कारमुळे रद्द झाले. हे व-हाड पैसे देऊन गेल्यानंतर वधू पक्षाने जवळच्या एका गावातून एका तरुणाला व-हाड घेऊन येण्यास सांगितले. त्यानंतर लग्नसोहळा दुस-या बरोबरच नवरीचा झाला. विशेष म्हणजे या प्रकाराची कोठेही दोन्ही पक्षांनी पोलिस स्थानकात तक्रार केली नाही.