बुधवार, ऑगस्ट 6, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

केंद्राचा रिलायन्स रिटेल जियोमार्टसोबत सामंजस्य करार…बचत गटांना होणार हा फायदा

by Gautam Sancheti
डिसेंबर 23, 2023 | 12:13 am
in राष्ट्रीय
0
image002CKPU

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दीनदयाळ अंत्योदय योजना- राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका मिशनच्या बचत गटांची उत्पादने जास्तीत जास्त बाजारापर्यंत पोहोचावीत आणि त्यायोगे ग्रामीण बचतगटाच्या कारागिरांच्या सक्षमीकरणासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाने रिलायन्स रिटेलच्या जियोमार्टसोबत सामंजस्य करार केला आहे.

यावेळी बोलताना ग्रामीण विकास मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव चरणजित सिंह म्हणाले की या सहकार्यामुळे बचतगटांना जियोमार्टच्या ई कॉमर्सवर उत्पादन विक्रेते म्हणून प्रवेश करता येईल आणि या उपक्रमामुळे सरस कलेक्शन अंतर्गत बचत गटांची उत्पादने जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याच्या ग्रामीण विकास मंत्रालयाच्या प्रयत्नांना चालना मिळेल. या भागीदारीमुळे महिला बचत गटांना मोठी बाजारपेठ आणि दृष्टीकोन प्राप्त होईल आणि त्यांना जियोमार्टच्या देशभरातील ग्राहकांना त्यांची विशेष उत्पादने उपलब्ध करून देता येतील. ग्रामीण विकास मंत्रालय आणि जियोमार्ट यांच्या भागीदारीचा एक भाग म्हणून या मंचावर दाखल झाल्यानंतर दीनदयाळ अंत्योदय योजना- राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका मिशनशी संबंधित असलेल्या बचत गटांच्या विक्रेत्यांना त्यांच्या व्यवसायाचा ऑनलाईन विस्तार करण्यामध्ये लाभ आणि मार्गदर्शन उपलब्ध होईल.

सिंह पुढे म्हणाले की ग्रामीण विकास मंत्रालय आणि जियोमार्ट यांच्या या भागीदारीमुळे बचत गटांच्या भगिनींच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी मंत्रालय करत असलेल्या प्रयत्नांमध्ये भर पडेल. शाश्वत तत्वावर बचत गटांच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी हे अभियान कार्यरत आहे आणि या पावलामुळे आमच्या उपक्रमांमध्ये आणखी भर पडेल, असे त्यांनी सांगितले.

ग्रामीण विकास मंत्रालयाच्या संयुक्त सचिव स्वाती शर्मा यांनी सर्व हितधारकांचे अभिनंदन केले. महिला बचत गटांच्या रोजगार संधींमध्ये वाढ करण्यासाठी त्यांना आवश्यक ते पाठबळ देण्यासाठी मंत्रालय वचनबद्ध आहे आणि जियोमार्टसोबतच्या या भागीदारीमुळे या दिशेने पाठबळ मिळेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

या भागीदारीबाबत बोलताना रिलायन्स रिटेल लिमिटेडचे सार्वजनिक धोरण आणि नियामक प्रमुख आणि अध्यक्ष डॉ. रवी प्रकाश गांधी म्हणाले की ग्रामीण विकास मंत्रालयासोबत भागीदारी करणे हे आमचे पहिले पाऊल आहे आणि भविष्यात अशाच प्रकारच्या अनेक फलदायक भागीदाऱ्या होतील.

जियोमार्ट देखील त्यांना त्यांच्या व्यवसाय उभारणीसाठी, दिशादर्शनासाठी आणि बाजारामध्ये त्यांचे स्थान निर्माण करण्यासाठी मदत करेल.त्या व्यतिरिक्त या पोर्टलवर विक्री करण्याच्या अनुभवाबाबत परिचित करून देण्यासाठी जियोमार्ट ग्रामीण मंत्रालयाकडून आयोजित होणाऱ्या प्रशिक्षण आणि कार्यशाळांमध्ये संयुक्त सहभाग घेईल. त्याबरोबरच शाश्वत वृद्धी आणि व्यापार स्थैर्य सुनिश्चित करण्यासाठी जियोमार्ट या विक्रेत्यांना बाजारात त्यांच्या व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी उद्घाटन पश्चात प्रशिक्षण आणि पाठबळ देईल आणि तसेच या मंचावर विक्री विषयक प्रोत्साहन देणाऱ्या विविध उपक्रमांमध्ये सहभागी करून घेईल.

या भागीदारीमुळे ग्रामीण विकास मंत्रालयांतर्गत असलेल्या सरस कलेक्शन ब्रँड अंतर्गत बचत गट जियोमार्टवर आणले जातील आणि त्यामुळे पारंपरिक वस्त्रप्रावरणांपासून ते गृह सजावट आणि सौदर्य उत्पादनांपर्यंत हातमाग आणि हस्त कलाकृतीविषयक उत्पादने या मंचावर उपलब्ध होतील.

जियोमार्ट विषयी
जियोमार्ट या रिलायन्स रिटेलच्या ई-टेल शाखेने 2020 मध्ये या क्षेत्रात पदार्पण केले. भारतातील सर्वात मोठ्या देशी ई- बाजारपेठांपैकी एक असलेल्या या मंचावर जियोमार्ट लघु आणि मध्यम उद्योजकांचे सक्षमीकरण करत आहे आणि त्यांना संधी उपलब्ध करून देत आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिक जिल्हयातील आंतर तालुका टी-२० क्रिकेट स्पर्धेत या तालुक्याचे संघ ठरले विजयी

Next Post

लग्नात क्रेटा कार देण्याऐवजी स्विप्ट कार दिल्यामुळे नवरदेवाने लग्नच मोडले..वधु पक्षाने व-हाडालाच केले बंदी…पुढे बघा काय घडलं

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
Untitled 168

लग्नात क्रेटा कार देण्याऐवजी स्विप्ट कार दिल्यामुळे नवरदेवाने लग्नच मोडले..वधु पक्षाने व-हाडालाच केले बंदी…पुढे बघा काय घडलं

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींची मनोकामना पूर्ण होतील, जाणून घ्या, गुरुवार, ७ जुलैचे राशिभविष्य

ऑगस्ट 6, 2025
देवगाव शनि हरिनाम सप्ताह सोहळा ३ 1024x527 1

सरला बेट विकास आराखडा व शनि देवगाव येथील बंधाऱ्यास मंजूरी देणार…मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ऑगस्ट 6, 2025
IMG 20250806 WA0367

नाशिक शहरात तोतया अन्न भेसळ अधिकाऱ्याचा धुमाकूळ…अशी करतो वसुली

ऑगस्ट 6, 2025
dada bhuse

आता विद्यार्थ्यांना पहिलीपासून एनसीसीच्या धर्तीवर प्रशिक्षण…शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

ऑगस्ट 6, 2025
Untitled 7

राज्यातील ५ ज्योतिर्लिंग विकास आराखड्यांच्या अंमलबजावणीसाठी वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांची नियुक्ती

ऑगस्ट 6, 2025
Untitled

ठाकरे ब्रॅण्ड…मुंबईत या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गट आणि मनसेची युती…

ऑगस्ट 6, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011