गुरूवार, ऑगस्ट 7, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिक जिल्हयातील आंतर तालुका टी-२० क्रिकेट स्पर्धेत या तालुक्याचे संघ ठरले विजयी

by Gautam Sancheti
डिसेंबर 23, 2023 | 12:02 am
in स्थानिक बातम्या
0
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

प्रातिनिधीक संग्रहित फोटो


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राजेंद्र (नाना) सूर्यवंशी यांच्या सहकार्याने व नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित किशोर सूर्यवंशी मेमोरियल ट्रॉफी आंतर तालुका क्रिकेट स्पर्धेत हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान, गोल्फ क्लब, मैदानावर अंतिम सामन्यात सुरगाणा संघाने मालेगाव संघावर ५ गडी राखून विजेतेपद पटकावले. शेवटच्या चेंडू पर्यंत रंगलेल्या या सामन्यात स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रथमच पोहोचलेल्या सुरगाणा संघाने हि दहावी किशोर सूर्यवंशी मेमोरियल ट्रॉफी जिंकली.

अंतिम सामन्यानंतर लगेच सूर्यवंशी परिवाराच्या सहकार्याने नियमित पणे होत असलेल्या या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा झाला. कै. किशोर सूर्यवंशी यांचे बंधु महाराष्ट्र राज्याचे उत्पादन विभागाचे आयुक्त मा. विजय सूर्यवंशी याप्रसंगी प्रमुख पाहुणे होते. यांचेसह मंचावर राज सूर्यवंशी, महाराष्ट्राचे माजी खेळाडू अपूर्व दराडे , नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे – सह सचिव योगेश -मुन्ना- हिरे , सेक्रेटरी समीर रकटे , निवड समिति सदस्य सतिश गायकवाड स्थानापन्न होते. तसेच एनडीसीएचे इतर पदाधिकारी, संघ प्रशिक्षक, उपांत्य व अंतिम फेरीतील संघ आदी उपस्थित होते. याप्रसंगी योगेश -मुन्ना- हिरे यांनी समयोचित भाषण केले. प्रमुख पाहुणे विजय सूर्यवंशी यांनी खेळाडूंना मार्गदर्शन करत या स्पर्धेतूनच भावी राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू मिळावेत अशी अपेक्षा व्यक्त केली. सेक्रेटरी समीर रकटे यांनी आभार मानले. या छोट्याशा आटोपशीर सोहळ्याचे सूत्रसंचालन केले विवेक केतकर यांनी केले.

अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करत मालेगाव संघाने ६ बाद ११६ धावा केल्या. अजिंक्य खापरेने सर्वाधिक २६ धावा केल्या. रामदास धुम ने ३ बळी घेतले . सुरगाणा संघाने विकास राठोड च्या फटकेबाज नाबाद ४४ धावांच्या जोरावर शेवटच्या चेंडूवर विजयी धाव घेतली. मंगेश शिरसाट यांनी सुरगाणा संघाचे प्रशिक्षक होते .

स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज ठरला नाशिक ग्रामीणचा नितीन कडाळे – १४७ धावा . सर्वोत्कृष्ट गोलंदाज म्हणून सुरगाणाचा तुषार धुम – १० बळी तर सर्वोत्कृष्ट यष्टीरक्षक म्हणून मालेगावचा किशन पेंढारकर – यष्टीमागे ९ बळी – यांनी पारितोषिक मिळवले . मालिकावीराचा बहुमान मिळवला सुरगाणाचा हेमंत चौधरीने – १५० धावा व ८ बळी .

या टी-ट्वेंटी सामन्यांच्या स्पर्धेमुळे नाशिक जिल्ह्यातील तालुक्यातील खेळाडूंना जिल्हास्तरावर आपल्या कामगिरीचे प्रदर्शन करण्याची संधी मिळते. या स्पर्धेसाठी खास नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेच्या विविध निवड समिती सदस्यांनी, जिल्ह्याच्या सर्व १५ तालुक्यात जाऊन निवडीची प्रक्रिया पूर्ण करून प्रत्येक तालुक्याचा अंतिम संघ निवडला .जिल्ह्यातील सर्व १५ तालुक्यांनी या स्पर्धेत भाग घेतला. चार गटात १५ संघात २३ साखळी व बाद फेरीचे ३ असे एकूण २६ सामने झाले.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

ज्येष्ठ नागरिकांच्या तक्रारींची तात्काळ दखल घ्या.. या जिल्हाधिका-यांनी दिल्या सूचना

Next Post

केंद्राचा रिलायन्स रिटेल जियोमार्टसोबत सामंजस्य करार…बचत गटांना होणार हा फायदा

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
image002CKPU

केंद्राचा रिलायन्स रिटेल जियोमार्टसोबत सामंजस्य करार…बचत गटांना होणार हा फायदा

ताज्या बातम्या

Untitled 6

उतराखंडमध्ये अडकलेल्या जळगाव जिल्ह्यातील १६ भाविकांसाठी पालकमंत्र्यांचा दिल्लीत विशेष पाठपुरावा…

ऑगस्ट 7, 2025
modi 111

भारता विरुद्ध अमेरिकेचे टेरिफ वॉर….पंतप्रधान मोदी यांनी डोनाल्ड ट्रम्पचे नाव न घेता दिले प्रत्त्युत्तर….

ऑगस्ट 7, 2025
Untitled 8

बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या समुद्राखालील ७ किमी लांबीच्या मार्गाच्या कामाला प्रारंभ…

ऑगस्ट 7, 2025
प्रातिनिधिक फोटो

सिंहस्थ कुंभ मेळा…नाशिक जिल्ह्यात ३९३ कोटी रुपये खर्चाचे १८ रेल्वे मार्गावरील उड्डाणपूलांना मंजूरी

ऑगस्ट 7, 2025
fir111

अमली पदार्थाची विक्री करणारा प्लेडर पोलीसांच्या जाळयात…५.५ ग्रॅम वजनाचे एमडी सदृष्य अंमलीपदार्थ जप्त

ऑगस्ट 7, 2025
Paytm Raksha e1754530011544

रक्षाबंधनाकरिता पेटीएमने दिले हे सहा गिफ्टिंग पर्याय…बघा, संपूर्ण माहिती

ऑगस्ट 7, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011