मालेगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – येथील संगमेश्वरातील सराईत गुन्हेगारावर सामान्य रुग्णालयातच टोळक्याकडून कोयत्याने हल्ला केल्याची घटना घडली असून ही घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. सराईत गुन्हेगार उबेद उर्फ बद्या याचे नशा करण्याच्या कारणावरून त्याच्याच मित्रांमध्ये वाद होऊन भांडण झाले. या भांडणात उबेद याला बेदम मारहाण करण्यात आल्याने तो जखमी झाला. तेव्हा त्याच्या नातेवाईकांनी त्याला मालेगाव सामान्य रुग्णालय येथे उपचारार्थ दाखल केले.
मात्र हे प्रकरण एवढ्यावरच थांबले नसून त्याच रात्री दहा वाजेच्या सुमारास दहा – बारा जणांच्या टोळक्याने थेट सामान्य रुग्णालयात जाऊन रुगण्यालयाची तोडफोड करत उबेद वर कोयत्याने वार केले.
या हल्यात सामान्य रुग्णालयाचे कर्मचारी देखील जखमी झाले आहे. या आधी देखील सामान्य रुग्णालयाची तोडफोड करण्याचे प्रकार घडले असून पुन्हा एकदा सामान्य रुग्णालयाची तेथील डॉक्टर, कर्मचारी स्टाफ यांचा सुरक्षेचा प्रश्न एरणीवर आला आहे. ही सर्व घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे.