नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- खानदेशचे वैभव आणि भाषा यांची जपवणूक करण्याची गरज असून खानदेश महोत्सवाने त्यास निश्चितच चालना मिळेल,असे प्रतिपादन माजी केंद्रीयमंत्री विजय नवल पाटील यांनी केले.
नाशिक पश्चिमच्या आ.सीमा हिरे यांच्या सौजन्याने त्रंबक रोडवरील ठक्करडोम येथे आयोजित चार दिवसांच्या खानदेश महोत्सवाचे उद्घाटन विजय नवल पाटील यांच्या हस्ते आणि मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले त्यावेळी विजय नवल पाटील बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय जनता पार्टीचे प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी,महानगराध्यक्ष प्रशांत जाधव, सरचिटणीस नाना शिलेदार,मंडलाध्यक्ष अविनाश शिंदे,देवदत्त जोशी,मनसेचे पदाधिकारी सलीममामा शेख,महोत्सवाच्या आयोजक आ.सीमा हिरे,महेश हिरे,रश्मी हिरे- बेंडाळे,प्रतिभा पवार,भाजपा महिला मोर्चा अध्यक्ष सोनाली ठाकरे,अर्चना दिंडोरकर,अलका अहिरे, श्याम बडोदे, राजेश दराडे, योगेश हिरे, राकेश ढोमसे,राजन लाभे,रामदास वाघ,उषाताई सावंत,सुभाष अहिरे,सुरेश पवार,डॉ.पल्लवी बनसोडे,शिवाजी साळुंखे, डॉ. मंजुषा दराडे,हर्षवर्धन बोऱ्हाडे, धीरज चौधरी, मनीषा पाटील, सदाशिव सूर्यवंशी,अजय बिरारी, मनीषा पाटील आदी होते.
अटलजी यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून सीमाताई हिरे यांनी सुरू केलेला आनंद मेळ्याचे रूपांतर आता खानदेश महोत्सवात झाले असून हा प्रवास निश्चितच स्तुत्य आहे. खानदेशचे वैभव जोपासण्याचे कार्य माध्यमातून होत असल्याची बाब प्रशंसनीय आहे.अहिराणी भाषा जगविण्याचे कार्य यानिमित्ताने होत असल्याने त्याचेही कौतुक केलेच पाहिजे,असे भारतीय जनता पार्टीचे प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सांगितले.पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनीही या महोत्सवाचे तोंडभरून कौतुक केले. खानदेशी खाद्यपदार्थांची रेलचेल यामुळे नागरिकांना अनुभवता येणार आहे,असेही त्यांनी पुढे नमूद केले.आपल्या प्रास्ताविक भाषणात महोत्सवाच्या आयोजिका आ.सीमाताई अहिरे यांनी अहिराणी भाषेत सर्वांचे स्वागत करून उपस्थितांची मने जिंकली.कोरोना काळातील दोन वर्षे वगळता २०१७ पासून सुरू झालेल्या या महोत्सवाला आतापर्यंत नाशिककरांनी भरभरून प्रतिसाद दिल्याचे त्यांनी गौरवाने नमूद केले.
यानिमित्ताने खानदेशची माणसे एकत्र येतात. त्यांच्या कलाकृती सादर करतात. खानदेशची संस्कृती, खाद्यपदार्थ यांची माहिती लोकांना होते. दरवर्षी या महोत्सवाला मिळत असलेला प्रतिसाद वाखाण्याजोग आहे,असे सीमाताई यांनी आवर्जून नमूद केले. माजी नगरसेविका प्रतिभाताई पवार यांनी अहिराणी भाषेत आभार मानून सर्वांची मने जिंकली.
खानदेश महोत्सवाचा श्री गणेशा विजयनगर( सिडको) येथून निघालेल्या शोभायात्रेने झाला. पारंपारिक आदिवासी नृत्य, विविध पथके, हनुमानाचा वेश परिधान करणारी व्यक्ती, शिरपूरचे बँड पथक ही मिरवणुकीतील खास वैशिष्ट्य होती. पवननगर,सीसीएममार्गे आलेल्या या शोभा यात्रेचा समारोप ठक्करडोम येथे झाला.कार्यक्रमस्थळी काही प्रात्यक्षिके सादर झाली आणि खानदेश महोत्सवास उपस्थित असलेल्या लोकांनी त्यास मुक्तकंठाने दात दिली.सूत्रसंचालन रश्मी हिरे-बेंडाळे यांनी आपल्या खास शैलीत केले.रश्मीताईंच्या वाढदिवसानिमित्त उपस्थितांनी भरभरून शुभेच्छा दिल्या.खानदेशच्या साहित्यिकांच्या कवी संमेलनासह विविध कलाकृती सादर झाल्या.त्याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लाभला.महोत्सवात शंभरहून अधिक स्टॉल्स येथे लावण्यात आले असून खानदेशच्या खाद्यपदार्थांची रेलचेल येथे बघावयास मिळत आहे.अहिराणी गिते,अहिराणी भाषेचे संवर्धन यावर या महोत्सवात विशेष भर देण्यात येत आहे.
प्रारंभी नाशिकचे माजी खासदार प्रतापदादा सोनवणे यांच्या निधनाबद्दल त्यांना भावपूर्ण श्रद्धांजलीहीं अर्पण करण्यात आली.महोत्सवाच्या पहिल्या दिवशी नाशिककरांनी ठक्करडोम येथे मध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.