रविवार, ऑगस्ट 10, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिकचा चेहरा बदलण्यासाठी कंपन्यांनी सीएसआर फंडातून हातभार लावा….पालकमंत्री दादाजी भुसे यांचे आवाहन

by Gautam Sancheti
डिसेंबर 22, 2023 | 5:35 pm
in स्थानिक बातम्या
0
IMG 20231222 WA0306

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) -क्वालिटी सिटी मध्ये नाशिकची झालेली निवड व आगामी सिंहस्थ कुंभमेळा या बाबी लक्षात घेवून सामाजिक दायित्व निधीच्या माध्यमातून कंपन्यांनी नाशिकचा चेहरा बदलण्यासाठी हातभार लावावा. त्याचप्रमाणे शहराच्या सुशोभिकरणासाठी नागरिकांनी स्वयंस्फुर्तीने सहभागी व्हावे, असे आवाहन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी केले आहे.

आज जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात सामाजिक दायित्‍व निधी (सीएसआर) बाबत घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत पालकमंत्री भुसे बोलत होते. यावेळी नाशिक महानगरपालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे, मालेगाव महानगपालिका आयुक्त राजेंद्र जाधव, नाशिक महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रतिभा संगमनेरे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी, नाशिक एमआयडीसी चे प्रादेशिक अधिकारी नितीन गवळी, नाशिक महानगरपालिका समाज कल्याण उपायुक्त प्रशांत पाटील, शहर अभियंता शिवकुमार वंजारी, नाशिक महानगरपालिका सीएसआर प्रमुख विशाल तांबोळी, निमा अध्यक्ष धनंजय बेळे, निमा सचिव राजेंद्र अहिरे, आयमा अध्यक्ष निखील पांचाळ, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स चे संजय सोनवणे यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी व औद्योगिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री दादाजी भुसे म्हणाले, औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांना होणाऱ्या नफ्याच्या प्रमाणात सामाजिक दायित्व निधीच्या माध्यमातून विविध समाज उपयोगी कामे केली जातात. या कामांमध्ये आगामी कुंभमेळ्याच्या अनुषंगाने शहराच्या सौंदर्यीकरणासाठी विविध पायाभूत सुविधा सीएसआर च्या माध्यमातून उपलब्ध करून दिल्यास शहर सुशोभिकरणास मदत होणार आहे. यासोबतच शहरातील महत्वाच्या रस्त्यांच्या कडेला अनेक वर्षांपासून बंद पडलेली वाहने ज्या वाहन मालकांची असतील ती त्यांनी लवकरात लवकर हटविण्याचे आवाहन देखील पालकमंत्री श्री. भुसे यांनी केले आहे. या बैठकीच्या दरम्यान औद्योगिक कंपन्यांच्या पदाधिकारी यांना सीएसआर मध्ये कामे करतांना येणाऱ्या समस्यांबाबत चर्चा करून काही विधायक सूचना ही पालकमंत्री श्री. भुसे यांच्या समोर मांडल्या.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिकला परिक्षेला आलेल्या नगर जिल्ह्यातील विद्यार्थ्याची बॅग परिक्षास्थळावरुन केली लंपास

Next Post

धक्कादायक…सिडकोत सलग पाच दिवस दोन लहान मुलांचा लैगिंक छळ, ६० वर्षीय वृध्दावर गुन्हा दाखल

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
fir111

धक्कादायक…सिडकोत सलग पाच दिवस दोन लहान मुलांचा लैगिंक छळ, ६० वर्षीय वृध्दावर गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

1024x684 e1754789651386

आता देवाभाऊ लाडकी बहीण महिला नागरी सहकारी पतसंस्था…महसूलमंत्री यांच्या हस्ते उद्घाटन

ऑगस्ट 10, 2025
1000037876 1920x1282 1

वाळू माफियांविरोधात महसूल मंत्री ॲक्शन मोडवर…एमपीडीए कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्याचे दिले निर्देश

ऑगस्ट 10, 2025
IMG 20250809 WA0063 1 e1754788671829

दिंडोरीत बिबटया युगलाचा पोल्ट्री शेडवर रोमान्स…प्रेमाच्या आणाभाका घेतांना पत्रे फुटून दोघे पडले शेडमध्ये

ऑगस्ट 10, 2025
election11

भारत निवडणूक आयोगाकडून ३३४ पक्षांची नोंदणी रद्द….राज्यातील या नऊ पक्षांचा समावेश

ऑगस्ट 10, 2025
Screenshot 20250809 201400 Collage Maker GridArt

दिंडोरी शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात महिलेचा बळी…ग्रामस्थांचा दीड तास रास्ता रोको

ऑगस्ट 9, 2025
IMG 20250809 WA0502

सिन्नर बसस्थानकाच्या ताफ्यात ५ नवीन बस दाखल…

ऑगस्ट 9, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011