येवला (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – येवला तालुक्यात अंदरसुल येथे सकल मराठा समाजाने रास्ता रोको केला. उंदीरवाडी येथे मनोज जरांगे पाटील यांच्या गाव बंदीच्या बॅनरवरील छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्या फोटोची विटंबना केल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले. यावेळी नाशिक-छत्रपती संभाजी नगर महामार्गावर रास्ता रोको करण्यात आले. यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.
मराठा आरक्षण प्रकरणावरुन या तालुक्यात काही गावांमध्ये संघर्ष होत असतो. पण, त्यानंतर तो मिटवलाही जातो. पण, फोटोची विटंबना कोणी केली व का केली हा प्रश्न आहे.
दोन समाजात भांडण लावण्यासाठी काही जण हे कृत्य करत असतात. त्यामुळे वाद होतात. त्यामुळे हे नेमके कोणी केले व का केले हा प्रश्न अजूनही समोर आला नाही. पण, या घटनेमुळे मात्र सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.