नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) विजेचे कनेक्शन घेण्यासाठी ३००० हजार रुपये लाच मागणा-या वायरमन अनिल राठोड याला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. जळगाव जिल्ह्यातील ही घटना असून तक्रारदार जळगाव येथील असून वरिष्ठ तंत्रज्ञ (वायरमन) राठोड हा चोपडा तालुक्यातील धानोरा येथील आहे.
या कारवाईबाबात एसीबीने सांगितले की, तक्रारदार यांचे पत्नीचे नावाने देवगांव ता. चोपडा शिवरात शेत गट नंबर ३३० मध्ये शेतात ३ फेजचे ट्युबवेलचे मोटार साठी यातील तक्रारदार यांनी विजेचे कनेक्शन घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज केला होता. त्यानंतर तक्रारदार हे राठोड यांना संबधीत कामाबाबत भेटले. त्यावेळी राठोड यांनी तक्रारदार यांचेकडे त्या कामासाठी मला ४००० हजार रुपये द्यावे लागतील असे सांगतिले. त्यांनतर एसीबीकडे तक्रारदाराने धाव घेतली. आज पंचासमक्ष ४००० रुपयांची लाचेची मागणी केली व तडजोडअंती यातील राठोड यांनी पंचा समक्ष ३००० रुपये स्वतः स्विकारतांना त्यांना रंगेहात पकडण्यात आले आहे. त्यांचेवर अडावद पोलीस स्टेशन ता. चोपडा येथे गुन्हा दाखल करण्यात आला.
यशस्वी सापळा कारवाई
युनिट – जळगाव.
तक्रारदार- पुरुष,वय-50 रा. जळगांव जि.जळगांव
आलोसे- अनिल शंकर राठोड , वय 28, व्यवसाय , वरिष्ठ तंत्रंज्ञ, (वायरमन) धानोरा, रा. लक्ष्मी नगर धानोरा ता चोपडा जि.जळगांव वर्ग-4
*लाचेची मागणी- 4000/-
*लाच स्विकारली 3000/ रुपये
लाचेचे कारण
यातील तक्रारदार यांचे पत्नीचे नावाने देवगांव ता. चोपडा शिवरात शेत गट नंबर ३३० मध्ये शेतात ३ फेजचे ट्युबवेलचे मोटार साठी यातील तक्रारदार यांनी विजेचे कनेक्शन घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज केला होता. त्यानंतर तक्रारदार हे आलोसे यांना संबधीत कामाबाबत भेटले असता यातील आलोसे यांनी तक्रारदार यांचेकडे त्या कामासाठी मला ४००० हजार रुपये द्यावे लागतील असे सांगतिले. त्यांनतर आज रोजी आलोसे यांनी पंचासमक्ष ४००० रुपयांची लाचेची मागणी केली व तडजोडअंती यातील आलोसे यांनी पंचा समक्ष ३००० रुपये स्वतः स्विकारतांना त्यांना रंगेहात पकडण्यात आले आहे. त्यांचेवर अडावद पोलीस स्टेशन ता. चोपडा येथे गुन्हा दाखल करण्यात येत आहे. हॅश व्हॅल्यू घेण्यात आली आहे.
*सापळा पर्यवेक्षण अधिकारी – श्री.सुहास देशमुख, पोलिस उप अधीक्षक,ला.प्र.वि. जळगांव.
*सापळा व तपास अधिकारी – एन.एन. जाधव,पोलिस निरीक्षक,ला.प्र.वि. जळगांव.
*सापळा पथक – पो.ना. बाळू मराठे , पो कॉ अमोल सुर्यवंशी , पोकॉ सचिन चाटे