इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबई: जरांगे यांनी सरकारला नव्हे, तर सरकारनेच जरांगे याना वेठीस धरले आहे. यापुढच्या मेळाव्यात मी जरांगे यांच्याच बाजूने भाषण करणार असल्याचा उपरोधिक टोला मंत्री छगन भुजबळांना लगावला. मराठा आरक्षण प्रश्नावरून मनोज जरांगे पाटील यांनी भुजबळांना वाजवून काढण्याची भाषा वापरल्यानंतर भुजबळ यांनी यांनी उपहासात्मक शैलीत आज पत्रकारांना उत्तर दिली.
मुंबईत पत्रकार परिषदेत बोलताना भुजबळ म्हणाले की जरांगे यांच्या डोक्यात दररोज नवनव्या, अभिनव कल्पना येतात. त्यांचा आपण आदर केला पाहिजे. त्यांच्या मागण्या या तत्वनिष्ठ आणि कायद्याला धरून असतात. राज्य सरकारने आता वाटाघाटी न करता जरांगे म्हणतील, तसा मराठा आरक्षणाचा जीआर काढला पाहिजे.
यावेळी ते म्हणाले, यापुढे मंत्र्यांच्या शिष्टमंडळाने जरांगे यांना भेटायला जाण्याची गरज नाही. त्याऐवजी अंतरवाली सराटी येथे दोन-चार मंत्र्यांचे कायमस्वरुपी बंगले आणि मुख्य सचिवांचे कार्यालय सुरू केले पाहिजे. जरांगे यांच्या डोक्यातून एखादी अभिनव कल्पना निघाली, की मुख्य सचिव लगेच जीआर काढतील.
यावेळी ते म्हणाले मनोज जरांगे यांच्या संर्दभातील सर्व भाषणं आणि वक्तव्य मागे घेतोय आणि जरांगेच्या मतांशी आपणही सहमत आहोत. यावेळी त्यांनी उपरोधिक म्हणा, हतबलता म्हणाव काय म्हणायचं आहे ते म्हणा असेही सांगितले.