इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
गेल्या अडीच वर्षांपासून अफगाणिस्तानमध्ये महिलांवर अनेक बंधने घालण्यात आली आहेत. त्यात शिक्षणावर बंदीचा समावेश आहे; परंतु आता सर्व वयोगटातील मुलींना सरकारी-नियंत्रित मदरशांमध्ये शिक्षण घेऊ शकतात. शिक्षण मंत्राललयाचे प्रवक्ते मन्सूर अहमद यांनी तसे म्हटले आहे. शिकवण्यासाठी वयाची अट घालण्यात आली आहे.
मन्सूर अहमद यांनी तालिबान सरकारी अधिकाऱ्याने मदरशांमध्ये जाणाऱ्या मुलींची संख्या उघड केली नाही. अफगाणिस्तान हा जगातील एकमेव देश आहे, जिथे महिलांच्या शिक्षणावर बंदी आहे. अफगाणिस्तान सरकारने महिलांच्या शिक्षणावर बंदी घातली होती. शिक्षणामुळे समाजाची जडणघडण बिघडत आहे, असा तालिबानचा आरोप आहे. तालिबानने म्हटले आहे की असे काही विषय आहेत, ज्यामुळे इस्लामच्या शिकवणींचा अनादर होत आहे.
अफगाणिस्तानात २० हजार मदरसे मदरसे आहेत. त्यापैकी १३ हजार ५०० मदरसे अफगाणिस्तान सरकारच्या नियंत्रणाखाली आहेत. ऑगस्ट २०२१ मध्ये अफगाणिस्तानमध्ये तालिबान राजवट आल्यापासून, देशातील महिलांना लपून राहावे लागत नाही, तर आपल्या समस्या कोणाशी सांगायच्या या संभ्रमात आहेत. सध्या अस्तित्वात असलेला सर्वात मोठा अडथळा स्त्री शिक्षणाचा आहे. त्यांना शिक्षण किंवा शाळेत जाण्याची परवानगी नाही; मात्र आता तालिबानी अधिकाऱ्याच्या दाव्यानंतर काहीशी आशा निर्माण झाली आहे.