त्र्यंबकेश्वर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेक सोहळ्याचे हे ३५० वे वर्ष म्हणजेच हिंदू साम्राज्य दिनाचे ३५० वे वर्ष, विश्व हिंदू परिषदेचे हे षष्ठीपूर्ती वर्ष आणि प्रभू श्रीरामचंद्रांच्या भव्य मंदिराच्या पूर्णत्वाचे वर्ष यानिमित्त विश्व हिंदू परिषद बजरंग दल आयोजित शौर्य जागरण रथ यात्रा संपूर्ण जिल्ह्यातून काढली जाणार आहे. याचा शुभारंभ आज श्री क्षेत्र त्रंबकेश्वर येथून करण्यात आला.
भगवान त्र्यंबकेश्वराच्या मंदीरासमोर आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत श्री शंकरानंद सरस्वती तथा भगवान बाबा, महंत गिरीजानंद सरस्वती, ठाणापती महंत महेन्द्र गिरी महाराज, महंत पिनाकेश्र्वरगिरी महाराज, महंत जयदेवगिरी महाराज तसेच पुरोहित संघाचे अध्यक्ष मनोज थेटे, माजी नगराध्यक्ष रविंद्र सोनवणे त्यांच्या पत्नी माजी नगराध्यक्ष त्रिवेणी तुंगार सोनवणे आदी मान्यवरांचे हस्ते रथामधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन तसेच श्रीफळ वाढवुन यात्रेचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी प्रभु श्रीरामाचा व छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करण्यात आला. यावेळी विश्व हिंदु परिषदेचे पश्चीम महाराष्र्ट प्रांत मंत्री संजय मुद्राळे, नाशिक विभाग मंत्री अनिल चांदवडकर, नाशिक महानगर जिल्हा मंत्री योगेश बहाळकर, देविदास महाराज वारुंगसे, विजय चव्हाण, श्रीकांत क्षत्रीय, संदेश धात्रक, सोनु नागरे, नितीन मुर्तडक, दर्शन ठाकुर, संग्राम फडके, काशिनाथ गावीत, त्र्यंबकेश्वर प्रमुख अवधुत वाघ, सुनिल लोहगावकर, श्रीनिवास तथा वामन गायधनी आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॅा. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. डॅा. आंबेडकर चौकात माजी नगराध्यक्ष रविंद्र सोनवणे व परिवाराने रथारुढ शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन श्रीफळ वाढवले तर त्रिवेणी तुंगार यांनी महाराजांच्या पुतळ्याचे औक्षण केले.
१९८३ साली विश्व हिंदु परिषदेच्या वतीने गंगामाता रथयात्रा काढण्यात आली होती. त्यावेळी रथयात्रेचा शुभारंभ रविंद्र सोनवणे यांचे आजोबा बुध्दवासी सितारामशेठ सोनवणे यांचे हस्ते करण्यात आला होता. सदर घटनेला विहींप पदाधिकारी व सोनवणे परिवाराने उजाळा दिला. याचाच एक ऋणनिर्देश म्हणून आज रथयात्रेच्या शुभारंभाचा मान सोनवणे परिवाराला देण्यात आला. पोलीस निरीक्षक बिपिन शेवाळे, पोलीस उप निरीक्षक चंद्रभान जाधव व सहकार्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. यानंतर शौर्य जागरण रथयात्रा घोटीकडे रवाना झाली.