जालना (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गेल्या १५ दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे यांनी यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांनी आपण उपोषण सोडले तरी उपोषणस्थळी तळ ठोकून राहू. आंदोलन सुरुच राहील असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी सरकारपुढे पाच अटी ठेवल्या आहेत. त्या पाच अटी सरकारने मान्य कराव्यात, असेही ते म्हणाले.
यावेळी त्यांनी आपले उपोषण सोडवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सर्व मंत्रिमंडळ, खासदार उदयनराजे भोसले, माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांना बोलावले आहे. हे सर्वजण आले तर आपण उपोषण सोडू, असेही ते म्हणाले.
सरकार पुढे ठेवल्या या पाच अटी
- अहवाल कसाही येवो, मराठा समाजाला तिसऱ्या दिवशी पत्र वाटप करावे
- महाराष्ट्रामध्ये जेवढे गुन्हे दाखल झाले ते परत घ्यावे
- लाठीचार्ज करणारे पोलीस अधिकरी निलंबित झाले पाहिजेत
- उपोषण सोडायला मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सर्व मंत्री आणि छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी यावे
- सरकारच्या वतीने सर्व लिहून दिले पाहिजे
indiadarpanlive