इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
इंडिया आघाडीच्या नेत्यांनी नवी दिल्ली येथे जंतरमंतर १४६ खासदारांच्या निलंबनाविरोधात निदर्शने केली. यावेळी या आघाडीतील सर्वच पक्षांच्या नेत्यांनी सहभाग घेतला. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे, राहुल गांधी यांच्यासह राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची प्रमुख उपस्थितीत होती. देशभर हे आंदोलन केले जात असल्याचेही यावेळी सांगितले.
कालही इंडिया आघाडीच्या पक्षांच्या नेत्यांनी संसद ते विजय चौकापर्यंत मोर्चा काढला होता. त्यानंतर हे निदर्शन करण्यात येत आहे. लोकशाही वाचवा असा बॅनर लावत हे निदर्शन करण्यात आले.
पंतप्रधानांनी सुरक्षा भंगावर न बोलून संसदेच्या विशेषधिकाराचे उल्लंघन केले असल्याचे आरोप काल खरगे यांनी केला होता. आजच्या या आंदलोनात नेते काय बोलतात हे बघा….