इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
उत्तर भारतातून आलेल्या थंडीच्या लाटेमुळे महाराष्ट्र गारठला आहे. मराठवाडा, विदर्भात पारा दहा अंशाच्या आत आला आहे. कमी झालेले तापमान हे पिकांच्या पथ्थ्यावर पडले आहे. नाताळनंतर थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता आहे.
हिमालयात बर्फवृष्टी होत आहे. तिकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे महाराष्ट्रातील पारा चांगलाच घसरला आहे. विदर्भातील सर्व जिल्ह्यात तापमान दहा अंशाच्या आत पारा आला आहे. मराठवाड्यातही पारा दहा अंशावर आला आहे. वाढत्या थंडीमुळे सवर् ठिकाणी उबेसाठी शेकोट्या पेटायला लागल्या आहेत. या महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत थंडीचा कडाका जाणवत नव्हता. त्यामुळे शेतकरी चिंतेत होते.
थंडीअभावी पिकांच्या वाढीवर परिणाम झाला होता; मात्र गेल्या तीन दिवसांपासून तापमानात मोठ्या प्रमाणात घट झाली असून त्याचा फायदा रब्बी हंगामातील पिकांना होत आहे. पिकांना पोषक वातावरण निर्माण झाले आहे. थंडीपासून बचावासाठी नागरिक वेगवेगळ्या साधनांचा आधार घेत असले, तरी गहू, हरभरा, कांदा पिकाला पोषक वातावरण तयार झाले आहे.