इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
ख्रिसमस आणि नव्या वर्षाच्या सुरुवातीला खूश ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. या निर्णयात मद्यविक्रेतांना दुकानांच्या वेळांना सूट दिली आहे. २४, २५ आणि ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री १ वाजेपर्यंत मद्यविक्री करण्यास सरकारने मुभा दिली आहे. या तारखेला राज्यातील विविध मद्य दुकानं निर्धारित वेळेनंतर रात्री उशिरापर्यंत सुरु राहणार आहे.
या आदेशानुसार, विदेशी मद्य विकणारं किरकोळ विक्रीचे दुकान, उच्च दर्जाची आणि अतिउच्च दर्जाची श्रेणीवाढ मिळालेली एफएल -२ अनुज्ञप्ती, तसेच एफएळडब्ल्यू-२ प्रकारच्या दारुच्या विक्रेत्यांना रात्री उशिरापर्यंत दारु विक्रीस मान्यता दिली आहे. विशेष म्हणजे या निर्णय़ात ग्रामीण भागात वेगळ्या वेळा आणि शहरात खुल्ली सूट देण्यात आली.
या निर्णयात बीअर बारला रात्री १२ वाजेपासून पहाटे ५ वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी दिली आहे. या निर्णय़ात शहरी व ग्रामीण असेही भाग केलेल आहे. त्यामुळे शासनाचे नेमके परिपत्रक काय आहे ते बघा….