इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
कर्नाटकमध्ये आईनेच १५ महिन्याच्या मुलाला पाण्यात फेकून दिल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी या महिलेला अटक केली आहे. या हत्येमागे महिलनेचे अनैतिक संबंध असल्याचा संशय पोलिसांना आहे.
गुरुवारी ही माहिती पोलिसांनी दिली असून त्यांनी सांगितले की, कणवा तलावात आपल्या १५ महिन्यांच्या मुलाला फेकून देणा-या महिलेला अटक करण्यात आली आहे. भाग्यम्मा (२१) असे महिलेचे नाव आहे. ती पतीपासून विभक्त झाली आहे. ती चन्नापटना तालुक्यातील बनगहल्ली येथे तिच्या आईसोबत राहत होती. त्यावेळेस ती कपडे धुण्याच्या बहाण्याने घरातून गेली व तीने हे कृत्य केले. त्यानंतर ती घरी परत आल्यानंतर मुलगा तलावात पडल्याचे सांगितले.
आईच बनली वैरीण अनेक घटना समोर येत असतात. पण, आपल्या अनैतिक संबधासाठी पोटच्या मुलाला फेकून दिल्याची घटना धक्कादायक आहे. लहान मुलांना आईचे विश्व वेगळं असतं. सर्वात जास्त विश्वास व प्रेम तो आईवर करतो. त्याच आईने असे कृत्य करणे हे संतापजनक आहे.