इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नाशिक – ६ ऑक्टोंबर ते ८ ऑक्टोंबर दरम्यान परळी वैजनाथ, जिल्हा बीड येथे होणाऱ्या २५ वी सबजुनियर तलवारबाजी राज्यस्तरीय स्पर्धेसाठी नाशिकचा संघ रवाना झाला. यावेळी नाशिक जिल्हा क्रिडा अधिकारी श्रीमती सुनंदा पाटील, नाशिक जिल्हा तलवारबाजी संघटनेचे अध्यक्ष दत्ता पाटील, कार्याध्यक्ष उदय खरे, क्रीडा मार्गदर्शक अजिंक्य दुधारे, शिवछत्रपती पुरस्कार विजेते निलेश गुरुळे, श्रद्या वायदंडे, योगेश पटेल,जिल्हा सचिव राजु शिंदे, आनंद चकोर आदिंनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.
यावेळी बोलतांना जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील यांनी सांगितले की, मेहनत करणाऱ्या खेळाडूंना नक्कीच यश मिळते. आपल्या खेळाडूंचा चांगला सराव झाला आहे.त्यामुळे खेळाडूं चांगला खेळ करून पदके जिंकतील असा विश्वास व्यक्त केला. यावेळी राहुल फडोळ,जय शर्मा,दुष्यंत शिर्के,प्रसाद परदेशी,कल्याणी शेवाळे,हर्षदा नाईक आदी खेळाडू उपस्थित होते.
निवड झालेला संघ पुढीलप्रमाणे:-
ईपी मुले:-
१.विरल म्हस्के
२.कृष्णा गांगुर्डे
३.शुभम चौधरी
४.नितेश शेमले
ईपी मुली:-
१.अस्मी धामणे
२.अनन्या फडोळ
३.श्रग्वी शेटकर
४.रिद्धी दिवे
फॉईल मुले:-
१.शोर्य यादव
२.विराज केंद्रे
३.प्रशांत वसवे
४.कृष्णा गांगुर्दे
फॉईल मुली:-
१.लबदी मोदी
२.मोक्षिता केसरकर
३.तीर्थन्वी महाजन
४.मृगा शूचे
सेबर मुले:-
१.शारव भट्टड
२.सोहम हेकरे
३.विदित पवार
४.ज्ञानेश्वर शिंगाडे
सेबर मुली:-
१.रिद्धी दिवे
२.आशना शितोले
३.माही शूचे