नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक पोलिसांनी गुरुवारी सायकाळी ६ ते ८ वाजे दरम्यान पोलीस आयुक्तालयातील सर्व पोलीस ठाणे कडील तसेच गुन्हेशाखेकडील सर्व युनिट यांनी अंमली पदार्थाचे विक्री/सेवन करणारे रेकॉर्डवरील सराईत इसमांचा शोध घेण्यासाठी तसेच टवाळखोरावर कारवाई करण्यासाठी विशेष पथके तयार करून सर्व पोलीस ठाणे हददीत विशेष मोहिम राबविली.
सदर पथकांनी विशेष मोहिमे दरम्यान परिमंडळ- १ हददीत पंचवटी, आडगाव, म्हसरूळ, भद्रकाली, सरकारवाडा, गंगापूर, मुंबईनाका व गुन्हेशाखा युनिट -१, खंडणी विरोधी व गुंडा विरोधी पथक यांनी सार्वजनीक ठिकाणी उपद्रव करणा-या २०६ इसमांविरूध्द व परिमंडळ-२ हददीतील सातपर, अंबड, चुंचाळे चौकी, इंदीरानगर, उपनगर, नाशिकरोड, दे. कॅम्प, गुन्हेशखा युनिट -२, दरोडाशस्त्र विरोधी व अंमली पदार्थ विरोधी पथक यांनी २३६ इसमांविरूध्द अशा एकुण ४४२ इसमांविरूध्द महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ११२/११७ अन्वये कारवाई करण्यात आली आहे.
तसेच नाकाबंदी दरम्यान एकुण ३२ वाहनांवर मोटार वाहन कायदयाचे उल्लंघणार्थ १६ हजार दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. यापुढे वेळोवेळी विशेष मोहिमा राबवुन कारवाई करण्यात येणार आहे. सदर कारवाई दरम्यान तयार करण्यात आलेल्या विशेष पथकामध्ये गुन्हेशाखेकडील तसेच पोलीस ठाणेकडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी सहभाग घेऊन कारवाई केली आहे.