नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात दोन महिन्यांपूर्वीच कर्तव्यावर रुजू झालेले सहाय्यक पोलीस निरीक्षक कुंदन सोनवणे यांचे अपघाती निधन झाले आहे. लष्करी हद्दीतील पेट्रोल पंप जवळ लष्कराच्या वाहनाच्या धडक दिल्याी माहिती समोर आली आहे. ही घटना घडल्याच्या माहिती बाबत देवळाली पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे.
कर्तव्यावरून घरी जाताना वडनेर रोड परिसरात असलेल्या लष्कराच्या पेट्रोल पंपाजवळ लष्कराच्या गाडीचा त्यांच्या दुचाकीला धक्का लागला. धक्का लागल्याने देवळाली पोलीस स्थानकात कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक कुंदन सोनोने यांचा अपघात झाला होता.
मात्र लष्करी जवानांनी त्यांना उपचारासाठी लष्करी रुग्णालयात दाखल केले होते, मात्र उपचाराआधीच त्यांचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले असल्याची माहिती मिळली आहे. याप्रकरणी अद्याप पोलीस ठाण्यात कुठलीही नोंद झालेली नाही. या अपघाताचे काही फोटोही समोर आले आहेत.