गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

हलाखीच्या परिस्थितीवर मात करीत कोपरगावच्या लेकीचे मोठे यश….क्लास न लावता अशी झाली एमपीएससी उत्तीर्ण

by India Darpan
डिसेंबर 21, 2023 | 8:47 pm
in राज्य
0
IMG 20231221 WA0273 e1703171846373


पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- येथील निलीमा बाळकृष्ण नानकर या विद्यार्थिनीनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे घेण्यात आलेल्या दुय्यम निबंधक या परीक्षेत लख्ख यश मिळविले आहे. कुठलाही क्लास न लावता रात्रंदिवस अभ्यास करुन तिने वर्ग २चे सरकारी पद प्राप्त केले आहे. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीला तोंड देऊन या विद्यार्थिनीने यश मिळवून सर्वांसमोर आदर्श ठेवला आहे.

पतीचे निधन झाल्यानंतर संपूर्ण नानकर कुटुंब उघड्यावर पडले. अखेर मिनाक्षी नानकर यांनी आपल्या तिन्ही लेकींना घेऊन थेट कोपरगाव (जि. अहमदनगर) येथील माहेर गाठले. कर सल्लागार असलेल्या श्री राजेंद्र काशिनाथ वरखेडे यांनी आपल्या बहिणीला आणि तिन्ही भाचींना मोठा आधार दिला. मात्र, आपण कुणावरही अवलंबून रहायचं नाही असा चंग मिनाक्षी नानकर यांनी बांधला. परिणामी, शिवणकाम आणि स्वयंपाकाची कामे करुन त्यांनी तिन्ही लेकींना शिक्षणासाठी उद्युक्त केले. असंख्य अडचणी आल्या पण नानकर कुटुंबियांनी हार मानली नाही. मोठी कन्या शुभांगी हिने एमकॉमचे शिक्षण घेतानाच अकाऊंटंट म्हणून नोकरी पत्करली. त्याचवेळी तिने महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी (एमएसईबी)ची परीक्षा दिली. त्यात तिला यश आले. आज ती मुंबईत महावितरणमध्ये कार्यरत आहे.

द्वितीय कन्या हेमांगी हिने सुद्धा एमकॉमचे शिक्षण घेतले. तिनेही अकाऊंटटं म्हणून नोकरी करुन कुटुंबाला हातभार लावला. त्यानंतर ती सेट परीक्षा उत्तीर्ण झाली. आज ती पुण्यामध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे. या दोन्ही लेकींचे लग्न करण्यापासून सर्वच प्रकारची जबाबदारी मिनाक्षी यांनी पार पाडली. तर, धाकली कन्या निलीमा हिने एमकॉमचे शिक्षण घेतल्यानंतर एमपीएससीचा ध्यास घेतला. गेल्या तीन वर्षांपासून तिने एमपीएससीच्या विविध परिक्षा दिल्या. आणि आज दुय्यम निबंधक पदाचा निकाल जाहीर झाला आहे. त्यात ती उत्तीर्ण झाली आहे.
रात्रंदिवस अभ्यास

निलिमा ही एमकॉमचे शिक्षण घेत होती. त्याचवेळी अकाऊंट विषय शिकविणारे प्रा. रविंद्र जाधव यांनी निलिमाला एमपीएससीच्या परीक्षा देण्याचा सल्ला दिला. तो निलिमाने गांभिर्याने घेतला. मात्र, त्याविषयी तिला काहीही माहित नव्हते. अखेर तिने विविध पुस्तकांचे वाचन सुरू केले. त्यासाठी अभ्यासिका गाठली. विवाहित भगिनी शुभांगी आणि हेमांगी या दोघींनीही निलिमाच्या अभ्यासाचा खर्च उचलण्याचा निर्णय घेतला. अखेर निलिमाने थेट पुण्यातील हडपसर गाठले.

एमपीएससीचे कुठलेही क्लास न लावता हडपसरच्या महात्मा फुले अभ्यासिकेत सकाळी ७ ते रात्री ११ या वेळात प्रचंड अभ्यास केला. आणखी एका वाचनालयात ती रात्ररात्रभर अभ्यास करायची. याद्वारेच तिने एमपीएससीच्या विविध परीक्षा दिल्या. यातील एका परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला आहे. मात्र, अन्य परीक्षांमध्येही उत्तम निकालाची तिला अपेक्षा आहे.

सर्वत्र कौतुक आणि अभिनंदन
निलिमाच्या या यशाबद्दल तिचे, आईचे आणि दोन्ही बहिणींचे अभिनंदन केले जात आहे. महात्मा फुले अभ्यासिकेतही जल्लोष करण्यात आला. सायंकाळच्या सुमारास तिचा छोटेखानी सत्कार करण्यात आला.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

कोरोना जेएन-वन व्हेरिएंटचे संकट….मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले हे निर्देश

Next Post

होमेथॉन २०२३ गृहप्रदर्शनाचा शानदार प्रारंभ…पहिल्याच दिवशी १० हजार नागरिकांची भेट…१८ जणांनी केले फ्लॅटचे बुकिंग

India Darpan

Next Post
IMG 20231221 WA0284 1 e1703173526181

होमेथॉन २०२३ गृहप्रदर्शनाचा शानदार प्रारंभ…पहिल्याच दिवशी १० हजार नागरिकांची भेट...१८ जणांनी केले फ्लॅटचे बुकिंग

ताज्या बातम्या

State Fencing Championship Nashik Team. 1

महाराष्ट्र राज्य तलवारबाजी स्पर्धेत नाशिकच्या १८ खेळाडूंची रजत आणि कास्य पदकांची कमाई..

जुलै 3, 2025
fir111

हॉस्पिटल बाबत तक्रार असल्याची धमकी देत डॉक्टरकडे पाच लाखाची खंडणीची मागणी…गुन्हा दाखल

जुलै 3, 2025
Screenshot 20250703 150541 Collage Maker GridArt

नाशिकमधील या नेत्यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये केला प्रवेश…बघा, अधिकृत नावे

जुलै 3, 2025
Rahul Gandhi

३ महिन्यांत महाराष्ट्रात ७६७ शेतकऱ्यांची आत्महत्या, ही आकडेवारी नाही तर उद्ध्वस्त घरे…राहुल गांधी यांची पोस्ट

जुलै 3, 2025
IMG 20250703 WA0179 1

ब्रँडेड एक्सचेंज फेस्टिव्हल… जुने कपडे आणा, नवे ब्रँडेड कपडे न्या !

जुलै 3, 2025
Gu6RydgXEAE8ag e1751527545356

शिवसेना ठाकरे गटाच्या नाशिक महानगर प्रमुखपदी प्रथमेश गीते यांची नियुक्ती…सुनील बागुल यांची हकालपट्टी

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011