नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गुन्हेगारी कारवायामुळे शहरातून हद्दपार केलेल्या तडिपारास पोलिसांनी बेड्या ठोकल्या. कामटवाडा रोडवरील श्रीकृष्णनगर भागात ही कारवाई करण्यात आली असून याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
किशोर चंद्रभान आहेर (३२ रा.पांडूरंग रो हाऊस,कामटवाडा रोड श्रीकृष्णनगर) असे अटक करण्यात आलेल्या संशयित तडिपाराचे नाव आहे. आहेर याच्या गुन्हेगारी कारवायामुळे त्यास शहर पोलिसांनी शहर आणि जिह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार केले आहे. मात्र त्याचा वावर शहरातच होता. पोलिस त्याच्या मागावर असतांना संशयित आहेर बुधवारी (दि.२०) सायंकाळी आपल्या घरी आला असल्याची माहिती पोलिसांना मिळल्याने तो पोलिसांच्या हाती लागला. अंबड पोलिसांनी सापळा लावून त्यास बेड्या ठोकल्या असून याबाबत अंमलदार तुषार मते यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुह्याची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास पोलिस नाईक संगम करीत आहेत.
४४ वर्षीय व्यक्तीची आत्महत्या
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जेलरोड भागात राहणा-या ४४ वर्षीय व्यक्तीने आपल्या राहत्या घरात गळफास लावून घेत आत्महत्या केली. सदर इसमाच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याबाबत नाशिकरोड पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
प्रदिप कृष्णाजी साबळे (रा.शाहूल पॉईट समोर,कॅनलरोड श्रमिकनगर) असे मृत इसमाचे नाव आहे. साबळे यांनी बुधवारी (दि.२०) अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरात पंख्यास दोरी बांधून गळफास लावून घेतला होता. ही बाब निदर्शनास येताच शालक रूपेश मोकळ यांनी त्यांना तातडीने बिटको हॉस्पिटल येथे दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी तपासून मृत घोषीत केले. अधिक तपास हवालदार भोळे करीत आहेत.