रोहित्र्यातून ऑईलसह तांब्याची वाईंडीग चोरीस
नाशिक (इंडिाया दर्पण वृत्तसेवा)- वीज वितरण कंपनीच्या रोहित्र्यातून ऑईलसह तांब्याची वाईंडीग चोरीस गेल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना हनुमानवाडी भागात घडली. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महावितरण कंपनीचे प्रधान तंत्रज्ञ योगेश बर्वे यानी याबाबत फिर्याद दाखल केली आहे. बर्वे यांच्या निगराणी खालील मखमलाबाद नाका ते हनुमानवाडी रोडवरील योगेश्वर रोहित्रात ही चोरी झाली. बुधवारी (दि.२०) दुपारी ही घटना समोर आली. अज्ञात चोरट्यांनी बंद रोहित्राच्या टाकीतील ऑईल व तांब्याची वाईंडीग असा सुमारे १७ हजाराचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास हवालदार वाघमारे करीत आहेत.
२५ हजाराचे दोन मोबाईल केले लंपास
नाशिक (इंडिाया दर्पण वृत्तसेवा)- उघड्या घरात शिरून चोरट्यांनी सुमारे २५ हजार रूपये किमतीचे दोन मोबाईल चोरून नेल्याची घटना गंगापूरनाका भागात घडली. याप्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रमेश सुखदेव भणगे (२५ रा.शर्मिला अपा.जुना गंगापूरनाका) यांनी याबाबत तक्रार दाखल केली आहे. भणगे बुधवारी (दि.२०) आपल्या घरात असतांना ही घटना घडली. दरवाजा उघडा असल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या उघड्या घरात प्रवेश करून टेबलावर चार्जिंगला लावलेला आयफोन व विवो कंपनीचा मोबाईल असे दोन फोन चोरून नेले. अधिक तपास पोलिस नाईक गायकवाड करीत आहेत.
बंद कारखान्यातून चोरट्यांनी कॉपर चोरीला
नाशिक (इंडिाया दर्पण वृत्तसेवा)- बंद कारखान्यातून चोरट्यांनी कॉपर चोरून नेल्याची घटना औद्योगीक वसाहतीत घडली. या घटनेत चोरट्यांनी सुमारे ६६ हजार रूपये किमतीची वायर लांबविली असून याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सिध्दार्थ विवेक भामरे (रा.कुलकर्णी कॉलनी) यांनी याबाबत फिर्याद दाखल केली आहे. भामरे यांचा अंबड औद्योगीक वसाहतीतील आयमा ऑफिस परिसरात बूस्ट इलेक्ट्रॉनिक्स नावाची कंपनी आहे. मंगळवारी (दि.१९) रात्री अज्ञात चोरट्यांनी बंद कंपनीचे कुलूप तोडून कारखान्यातील सुमारे ६६ हजार रूपये किमतीची कॉपर वायर चोरून नेली. अधिक तपास हवालदार झोेले करीत आहेत.
आनंदनगर येथे घरफोडी
नाशिक (इंडिाया दर्पण वृत्तसेवा)- नाशिकरोड परिसरातील आनंदनगर येथे झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी सुमारे ६७ हजाराच्या ऐवजावर डल्ला मारला. त्यात सोन्या चांदीच्या दागिण्यांसह रोकडचा समावेश आहे. याबाबत उपनगर पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धन्नालाल नारायणदास सुर्यवंशी (७४ रा.ग्रिनेबल सोसा.जगतापमळा,आनंदनगर) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. सुर्यवंशी कुटूंबिय दि.२३ ते ३० आॅक्टोबर दरम्यान बाहेरगावी गेले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून बेडरूम मधील कपाटात ठेवलेली रोकड व सोन्याचांदीचे दागिणे असा सुमारे ६७ हजार रूपयांचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास पोलिस नाईक बोडके करीत आहेत.









