नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) –संसद भवनाच्या पायऱ्यावर तृणमूल काँग्रसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी भारताचे उपराष्ट्रपती व राज्यसभा सभापती जगदिप धनखड यांची नक्कल करुन अवमान करणारे व अशोभनिय वर्तन केले. याप्रसंगी उपस्थित खासदार यामध्ये सहभागी होऊन या नकलेवर हसून दाद देत होते. याचा निषेध करण्याऐवजी कॉग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी या सर्व प्रकाराची आपल्या स्वत:च्या भ्रमणध्वनीमध्ये चित्रफित काढली. या घटनेचा भारतीय जनता पक्षाने संपूर्ण देशात निषेध केला आहे. नाशिकमध्ये संवैधानिक पदाचा अपमान करणाऱ्या कल्याण बॅनर्जी व राहुल गांधी यांचा निषेध करून भाजपा कार्यकर्त्यांनी रविवार कारंजा येथे राहुल गांधीच्या पुतळयाला जोडे मारून तीव्र निदर्शने केली आहे.
माफी मांगो…माफी मागो… राहुल गांधी माफी मांगो…, कल्याण बॅनर्जी माफी मांगो…., धिक्कार असो …धिक्कार असो…राहुल गांधीचा धिक्कार असो….कल्याण बॅनजीचा धिक्कार असो…, भारत माता की जय… अशा घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या.
या आंदोलनात भाजपा शहराध्यक्ष प्रशांत जाधव व प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी यांच्या नेतृत्वात हे निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी काशिनाथ शिलेदार, सुनिल केदार, ॲड.शाम बडोदे, वसंत उशीर, अमित घुगे, अनिल भालेराव, सुजाता करजगीकर, पवन भगुरकर, अविनाश पाटील, ज्ञानेश्वर काकड, महेश हिरे, उत्तम उगले, ॲड.मिनल भोसले, राजेंद्र महाले,हेमंत शुक्ल, सोनाली ठाकरे, सागर शेलार, हर्षद जाधव, प्रविण भाटे, प्रशांत वाघ, पवन उगले, ऋषिकेश डापसे, सचिन मोरे, बाळासाहेब घुगे, सोमनाथ बोडके, राहुल कुलकर्णी, धनंजय पुजारी, उमेश शिंदे, धनंजय माने, इंदुबाई नागरे, तेजश्री काठे, गौतम हिरण, श्रीकांत खांदवे, सुनिल फरताळे, अक्षय गांगुर्डे, अमित चव्हाण, विक्रांत गांगुर्डे, प्रसाद धोपावकर, अनिता भामरे, गौरव घोलप, सतिष निकम, चंद्रकांत थोरात, मिलींद भालेराव, मोहन गायधनी, पवन जोशी, स्मिता मुठे, रोहिणी दळवी, भारती माळी, ऋषिकेश ठाणगांवकर, उमेश मोहिते, प्रविण पाटील, मिहीर हजारे, मोहन मिश्रा, सौरभ निमसे, अनिता सोनवणे, श्रीनिवास माचन, गिता वाघमारे, सागर धर्माधिकारी, महेंद्र पाटील, ऋषिकेश क्षीरसाठ, विनोद येवले, विजय गायखे आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते.